Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर ३०, २०२०

धक्कादायक:जेष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर/खबरबात:
आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना सोमवारी सकाळी घडली. त्यांनी आनंदवन येथील आपल्या राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली.त्यांना उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत.ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे- करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. प्राथमिक माहितीनुसार शीतल करजगी यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.

मागील काही दिवसांपासून आमटे कुटुंबियांच्या अंतर्गत वाद सुरु होते.महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेबर 2020 रोजी फेसबुक लाईव्ह करून संवाद साधला.

यात आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदनात सांगितल्या प्रमाणे महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि खासकरून विश्वस्तांवर आरोप केले गेले.डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी या संभाषणात त्यांचे सख्खे भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांबद्दल बेछुट आरोप केले. नंतर अर्ध्या तासाचं ते फेसबुकवरील लाईव्ह संभाषण डॉ. शीतल यांनी डिलिट केलं.असं एक प्रसिद्ध वित्तवाहिनीचे म्हणणे आहे . या नंतर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे.त्यात सर्व भाष्य हे तत्थ्यहीन असून कुणाचाही गैरसमज होऊ नये म्हणून हे संयुक्त निवेदन जाहीर करत असल्याचं आमटे कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

डॉ. शीतल आमटे-कराजगी यांना आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पद देण्यात आलं आणि त्यांचे पती गौतम-करजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली.

मात्र शीतल यांच्या आत्महत्येमागे नेमका वाद कोणता आहे?या व्यतिरिक्त आणखी काही वाद आहे का? याबद्दल अजूनही कोनाला स्पष्ट सांगता आले नाही.

डॉ. शीतल यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या ट्विटर अकाउंटवर केली होती हि पोस्ट
सोमवारी सकाळच्या सुमारास डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवर २९ नोव्हेंबर २०२० रोजी काढलेल्या एका पेंटिंगला 'War and Peace' #acrylic on canvas. 30 inches x 30 inches. शीर्षक देत सकाळच्या सुमारास अपलोड केला. यावरून त्या अत्यंत मानसिक तणावात असल्याचे स्पष्ट होते.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.