नागपूर- डॉ. पंजबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांना साकडे घालण्यात आले मंत्रालय मुंबई येथे संघटनेच्या वतीने रीतसर निवेदन देऊन खालील मागण्या मान्य करण्यासाठी साकडे घालण्यात आले.सदरील निवेदनाची प्रत मा.उप मुख्यमंत्री अजितदादा पवार व मा.शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना देखील देण्यात आले आहे.निवेदनात म्हटले आहे कि, डॉ. पं. दे. रा. शि. परिषद ही देशातील के. जी. पी. जी. पर्यंत कार्यरत सृजनशील शिक्षकांची संघटना आहे. शिक्षण, विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या न्याय हक्कांसाठी व हितासाठी आम्ही नेहमी विविध पातळ्यांवर नवोपक्रम राबवत असतो. भारत नवनिर्माणासाठी कार्य करणाऱ्या संघटनेच्या अनेक उपक्रमांची शासन प्रशासनाने वेळोवेळी दाखल घेतलेली आहे.
अशा डॉ. पं. दे. रा. शि. परिषदेच्या खालील मागण्या मागील वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. खालील मागण्या त्वरीत निकाली काढाव्यात.
मागण्या :-
१) सर्व शासकिय कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.
२) केंद्र सरकारच्या धर्तीवर शिक्षकांना किमान ३० दिवसांच्या वेतन एवढा बोनस द्यावा.
३) राज्यातील सर्व शिक्षकांचे वेतन CMP प्रणालीद्वारे करण्यात यावे.
४) शिक्षकांना कॅशलेस (Smart Card) वैद्यकीय परिपूर्ती योजना योजना लागू करून वैद्यकीय परिपूर्ती बिलासाठी होणारा विलंब व भ्रष्टाचार याला आळा घालावा.
५) राज्यातील सर्व पदवीधर शिक्षकांना त्वरित वेतनश्रेणी लागू करावी.
६) कोविद – १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्याय पुस्तिका पुरविण्यात याव्यात.
७) राज्यातील सर्व सार्वजनिक प्रणालीच्या शाळांना मोफत वीज पुरवठा करण्यात यावा जेणेकरून आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही शाळेचा विजपुरवठा खंडित केला जाणार नाही.
८) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळांना ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक इंटरनेट सारख्या पायाभूत सुविधा विनाविलंब उपलब्ध करून देवून ग्रामीण भागातील विध्यार्थ्याचे होत असलेले शैक्षणिक नुकसान टाळावे.
सदरील निवेदनावर डाँ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष पप्पू पाटील भोयर ,प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल ,महासचिव सुनिल चव्हाण,कार्याध्यक्ष दयानंद जाधव,कोषाध्यक्ष प्रभाकर पराड, शांताराम जळते,सतिष काळे,प्रा.शेषराव येलेकर,अंबादास रेडे,डाँ.विलास पाटील,राजकिरण चव्हाण ,विनोद आगलावे,शामराव लवांडे,संजय निंबाळकर,अजित पाटील,वसंत नेरकर,राजेंद्र भोयर,शालिक बोरसे,बंडू डाखरे,सुरेंद्र बनसिंगे, बाबा नागपुरे,राजेश मालापुरे,प्रवीण मेश्राम, सुरज बमनोटे, चेतन चव्हाण, योगेश कडू हर्षा वाघमारे, संजीव शिंदें, कीर्ती कालमेघ चेतना कांबळे,विजय कांबळे,गजानन कोंगरे,पुप्पा कोंडलवार ,मेघराज गवखरे, संगीता ठाकरे,स्वप्नील ठाकरे,विनोद चिकटे,गौरव शिंदे,पक्षभान ढोक,गुणवंत देव्हाडे, समीर शेख,प्रिया इंगळे, लोकोत्तम बुटले, नंदा वाळके,प्रल्हाद कर्हाळे,देवेंद्र संजय निंबाळकर ,भास्कर कढवणे,अनिल घोरपडे,वल्लभ गाढे,राजेश भोसले, बलवंत घोगरे,देविदास शिंदे,राजेंद्र चव्हाण,,दिलीप गायकवाड,अशोक कुटे विनोद आगलावे,रमेश पाटील,मनोजकुमार रणदिवे,निलेश पाटील,आनिल बोधे,डी.के.देसाई,गणेश उढाण,विजय कर्हाळे ,मधुकर मोरे,किरण पाटील,सुरेंद्र बालशिंगे,शिवशंकर स्वामी,संगिता निंबाळकर,विनोद डाखोरे,संजय आम्बरे,राम गायकवाड यांच्या. सह्या आहेत.