शेतकरी कामगार पक्ष; महिला नेत्या जयश्री वेळदा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत
गडचिरोली : जिल्ह्यात असलेली दारूबंदी कायम ठेवावी की, उठवावी यासाठी शेतकरी कामगार पक्षाने महिला नेत्या जयश्री वेळदा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठित केली आहे. अभ्यासपूर्ण निष्कर्षांसह दारूबंदी संबंधातील भूमिका येत्या आठ दिवसांत शेतकरी कामगार पक्ष स्पष्ट करणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात असलेली दारूबंदी उठवावी की उठऊ नये हा मुद्दा वादविवादाचा होत आहे. यासाठी सर्वसमावेशक जनहिताची अभ्यासपूर्ण भूमिका जनता आणि शासन-प्रशासनापुढे मांडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे पक्षाच्या राज्य चिटणीस मंडळाचे सदस्य तथा जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी पक्षाअंतर्गत कार्यकर्त्यांची शनिवारी (ता.३) सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली.
या समितीच्या अभ्यासपूर्ण निष्कर्षासह शेतकरी कामगार पक्षाची दारूबंदी संबंधातील भूमिका येत्या आठ दिवसांत जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने लागू केलेली चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आर्थिक नुकसानकारक असल्याने ही दारूबंदी उठविण्यासाठी राज्यातील सत्तापक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेतलेला असून सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांमध्ये टिकाटिप्पणी करणे सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष म्हणून याविषयी शेतकरी कामगार पक्षाने आपली भूमिका जनता आणि शासन -प्रशासनापुढे मांडावी, यासाठी पक्षाच्या महिला नेत्या जयश्री वेळदा यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे. समितीमध्ये पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस भाई रोहिदास कुमरे, दामोधर रोहनकर, विजयाताई मेश्राम, मंदाताई आवारी, संदेशाताई दरडे आदींचा समावेश आहे.