" हाथरस गॅंगरेप हत्त्याकांड अत्त्याचार व क्रुरता
: एड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर
पुणे- दि.५ आक्टोबर २०२०- वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालया समोर हाथरस गॅंगरेप हत्त्याकांडा चा निषेध करीत निदर्शने आंदोलन केले.
त्या वेळी ते म्हणाले की, " बीजेपी व आरएसएसने देशभर जातीवाद व धर्मवादाचाच प्रचार केला. त्याचा परिणाम म्हणजे त्यांनी जे पेरल तेच हाथरस हत्त्याकांड अत्त्याचार व क्रुरतेच्या रूपाने उगवलेले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व यूपी मुख्यमंञी योगी हे दोघेही संवेदनांहीन आहेत. हाथरस प्रकरण रेव्हेन्यू व पोलिस या दोनी खात्यांच्या मार्फत दडपण्याचाच प्रयत्न झाला आहे. योगी सरकारने कायद्यांची योग्य कृती करण्यात कसूर केली आहे. बलात्कार झालाच नाही असे आता सरकार म्हणत आहे. सर्व पुरावे नष्ठ करण्यासाठीच पिडीत मनिषाची बाॅडी रातोरात पोलीसांने जाळलेली आहे. पोलीसांची ही कृती सरकारचीच आहे. सरकारच पुरावे नष्ठ केलेले आहे. त्यामुळे प्रकरण चिघळले आहे. जनता आक्रोष करीत आहे.
हाथरस मनिषा वाल्मिकी गॅंगरेप हत्त्याकांड पिडीत कुटूंबाला न्याय मिळाला पाहीजे. पिडीत कुटूंबाने मागणी केली की, सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत न्यायमूर्ती कडून या प्रकरणाचा तपास झाला पाहीजे. कुटूंबाच्या या मागणीला माझा पाठिंबा आहे व समर्थन करतो. सरकारवर जनतेचा विश्वास राहीलेला नाही.
पिडीत कुटूंबाला मदत न्याय मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला आहे व पिडीत कुटूंबाला भेटण्यासाठी मी हाथरसला जाणार आहे.
हे प्रकरण घडले तेंव्हा मी बिहार मध्ये होतो.बिहारच्या गावात व तालुक्यात-जिल्ह्यात सर्वञ असे दिसले की जनतेचा सरकारवर विश्वास राहीलेला नाही.
राहुल गांधी आणि प्रियंका गांधी याच्या सोबत पोलीस जसे वागले तसेच यांचे सरकार असतांना हे व यांचे पोलीस सुध्दा आमच्याशी व आंदोलन कर्त्यांशी असेच वागलेले आहे. पण यांनी याचा यापूर्वी कधीही निषेध केलेला नाही. कोणी छोटामोठा असे काही नाही. म्हणून पोलीसांच्या वागण्यात नवीन काहीच नाही.
मी हाथरस गंगरेप हत्त्याकांडाचा निषेध करतो."
आंदोलनात महिला आघाडी अध्यक्षा अनिता चव्हाण, प्रा.अंजलीताई आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, फुलेआंबेडकर विद्वत सभा, पदाधीकारी व महिला पुरूष कार्यकर्ते मोठ्या संख्येनें उपस्थित होते.