Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑक्टोबर ०२, २०२०

उत्तरप्रदेशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी व्यक्त केली चिंता
अहेरी, ता. २ : हाथरस बलात्कारप्रकरणाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र, एवढ्या गंभीर घटनेबाबत उत्तर प्रदेश सरकार गंभीर नसल्याचा आरोप जि. प. सदस्या भाग्यश्री आत्राम यांनी केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यानी म्हटले आहे की,  दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर पुन्हा एकदा देशात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या बलात्काºयांना कडक शिक्षा होत नाही, तोवर अशा घटनांना आळा बसणार नाही, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. हाथरस प्रकरणात पीडित तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संताप व्यक्त होत आहे.
उत्तर प्रदेशात मुली व महिलांवर अन्याय अत्याचारांत वाढ झाली आहे. हाथरस येथील हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. स्त्रीला उपभोग्य वस्तू समजणाºया नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी प्रसिद्धी पत्रकान्वये त्यांनी केली आहे. जलदगती न्यायालयात सुनावणी होऊन गुन्हेगारांना सर्वाधिक कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे अमानवीय कृत्य रोखण्यासाठी जात, धर्म, भाषा यांच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून अशा घटनांच्या विरोधात आपण एकजुटीने उभे राहिले पाहिजे. अशा घटना घडू नयेत यासाठी आपापल्या भागात संघटित होऊन समाजमन तयार करायला हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.