माझ्यातला कवी मरत चाललाय
'पपायरस कल्याण
पुस्तकपेठ पुणे -नाशिक
समांतर भाग्य बडोदा येथे उपलब्ध
खरेतर एका कवीची कविता हेच त्याचे मनोगत असते..
या कवितासंग्रहाने मला खूप काही दिले. नाव, सन्मान, पुरस्कार, चर्चासत्र, कवितावाचन, मुलाखत मी केवळ या कवितासंग्रहमुळे अनुभवू शकलो.. विक्री आणि पुरस्कार या दोन बाबी समाधानकारक होत्या आणि त्या सोडल्या तरी या कवितासंग्रहाने मला मोठा गोतावळा दिला.. एखादं पुस्तक तुम्हाला कसे समृध्द करू शकते हे मी स्वतः अनुभवलं. 2019 च्या युवा साहित्य अकादमी पुरस्काराच्या शॉर्ट लिस्ट मध्ये या कविताससंग्रहाचा समावेश होता, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून कवितासंग्रहाला मागणी होती. सप्रेम भेट देण्याचे प्रसंग क्वचितच आले. अनेक मान्यवर समीक्षकांनी लिहिलं.
नाशिकचे निखिल दाते यांनी पुस्तक पेठेच्या माध्यमातून कवितासंग्रह विक्री करून मला अनेक ठिकाणी पोचवलं..
खूप साऱ्या आठवणी या पुस्तकाच्या निमित्ताने आहे. निवांत लिहिनच.
पुष्कळदा आम्हाला हा कवितासंग्रह हवा म्हणून वाचकांचे फोन येतात. त्यांच्या माहितीसाठी
माझ्यातला कवी मरत चाललाय हा कवितासंग्रह
पपायरस कल्याण -
पुस्तकपेठ नाशिक
पुस्तकपेठ पुणे
समांतर भाग्य बडोदा
सुर्यांश वितरण चंद्रपूर
येथे उपलब्ध आहे..
कविता संग्रह हवा असल्यास वरील ठिकाणी संपर्क करावा..