Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०३, २०२०

काटोलात जनता कर्फु यशस्वी




काटोल शहरात सर्वपक्षीय कडकडीत बंद यशस्वी

# मुख्य तार बाजार लोकडाऊन, रस्ते सामसूम, जनता बाहेर पडलीच नाही....
# सलग 4 दिवस राहणार बंद....
# काटोल कराचे मानले आभार


सुधीर बुटे
काटोल : जागतिक महामारी कोविड 19 चा वाढता संसर्ग, नागपूर जिल्हात ग्रामीण मध्ये तालुक्यात वाढणारे पोसिटीव्ह रुग्ण संख्या व मृतकाचा प्रमाण लक्षात घेता समाजातील सर्व घटक एक मताने पुढे आले त्यामुळे शहरात शनिवार पासून सलग 4 दिवस चालणार बंद यशस्वी झाल्याचे प्रतिक्रिया सर्व स्तरातून मिळाले. जनतेने अभूतपूर्व सहभाग दिल्याबद्दल नगराध्यक्ष वैशाली राजू ठाकूर यांनी आभार मानले. तालुक्यात 1060 पोसिटीव्ह केस निघाले असून यात काटोल शहराचा 75 टक्के वाटा आहे.मृतकाचा आकडा 19 वर गेला असून तरुण नगरसेविकेचा मृत्यू सह अनेकांचे संसाराला फटका बसला आहे . या गंभीर बाबी लक्षात घेता सर्वांचे सहकार्य आजचा यशस्वी बंद पुढे कायम राहणार असल्याचे कृती समितीने सांगितले. शहरात बंद यशस्वीते करिता ठाणेदार महादेव आचरेकर यांचे मार्गदर्शनात पोलीस प्रशासनाने पलीकडे जाऊन माणुसकी बजावत यात मोठे सहकार्य केले. वृत्तपत्राने सुद्धा जनजागृती केली असल्याचे नगराध्यक्ष यांनी सांगितले.


करोना संसर्गबद्दल जनतेनी गांभीर्य पाळले- चरणसिंग ठाकूर : सत्तापक्ष नेते
शहरात कोविडचे पादुर्भाव लक्षात घेता जनतेनी स्वतः गांभीर्याने घेतले. सर्वच व्यापाऱ्यांनी मास्क लावावा, ग्राहकांना मास्क करिता आग्रह करावा, असल्याशिवाय वस्तू देऊ नये असे सर्वांनी केल्यास संसर्ग चेन रोखता येईल,असे संदेश चरणसिंग ठाकूर यांनी दिला.

जनतेनी विना काम निघू नये - गिरीश पालिवाल अध्यक्ष,व्यापारी संघ
संसर्ग रोखण्यासाठी जनतेनी विना काम बाहेर पडू नये, शहरात वाढती संख्या लक्षात घेता जनतेचा , आमचे व्यापारी बांधव , न प यांचे स्वयं पुढाकार प्रस्ताव आला. त्यामुळे बंद यशस्वी राहिला. व्यापारी बाधित होण्याची संख्या वाढली आहे . याकरिता सर्व पक्षीय निर्णय घेण्यात आला आहे.पत्रकारांनी जनजागृतीच्या विशेष सहकार्य केले.

करोनाची साखळी तुटावयास पाहिजे - गणेश चन्ने राष्ट्रवादी शहर अध्यक्ष
करोना संसर्ग रोखण्यास चेन तुटणे गरजेचे आहे . आमचे नेते गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांचे मार्गदर्शनात मास्क, सेनेटाईजरचे निःशुल्क वाटप सुरू असून साखळी तोडणे गरजेचे असून शासनाचे दिशा निर्देशाचे पालन केल्यास बंद व पुढील पाऊल यशस्वी ठरेल.



काटोल चोफेर शांत दिसून आले
शहरात सर्वच प्रभागट कमी जास्त दररोज पोसिटीव्ह केस निघत आहे. आज सुद्धा टेस्ट 74 होऊन 13 केस निघाल्या होत्या वाढत्या संसर्ग व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता जनता कर्फु यशस्वी झल्याचे चित्र नगरीत बघावयास मिळाले.
काटोल शहरात सकाळ पासूनच सामसूम होती बाजारपेठ उघडलीच नाही. तसा शनिवार मार्केट क्लोज दिवस होता पण सर्वच मार्केट आज बंद होते . मेन रॉड गल्ली बोळ, बसत स्थानक आदी सर्व परिसर शांत निर्मनुष्य दिसून आला.पोलीस प्रशासन , काटोल कृती समिती उत्स्फूर्त कार्य करीत होते. जनतेनी सुद्धा त्यांचे आव्हान स्वीकारले व बंद यशस्वी ठरला पुढील तीन दिवस मंगळवार पर्यत बंद राहणार आहे . जनतेनी गांभीर्याने पालन करून करोना साखळी तोडण्याचे आव्हान कृती समितीने केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.