दिल्लीच्या एम्सचा अहवाल येतो. सुशांत राजपूत मृत्यू प्रकरणावर प्रकाश टाकतो. मीडिया उघडा पडतो. बिहार पोलिस नागडी होते. महाराष्ट्र पोलिसांच्या तपासावर शिक्कामोर्तब होते. महाराष्ट्र पोलिसांचा नावलौकिक कायम राहते. सीबीआयच्या तपासाने तावून सुलाखून बाहेर पडते. त्यासाठी ११० दिवस प्रतीक्षा करावी लागते. राजकीय खेळी डळमळीत होते. रिया चक्रवतीच्या बचावाचा मार्ग खुलतो. कंगनाच्या टिवटिववर प्रश्न लागतो. गळफासाने मृत्यू झाल्याचं उघड होतं.
देशातील सर्वोच्च आरोग्य संस्था एम्सने अहवाल दिला. त्यात सुशांतसिंह राजपूतचा मृत्यू गळफासाने झाला. सोबत मृत्यूचे कारण विष नाही. ड्रग नाही. चित्रपट सृष्टीतील राजकारण नाही. हे स्पष्ट झालं. बिहार पोलिसांचा ड्रामा. कंगनाचा ठुमका व्यर्थ गेला. या सोबतच राज्यातील पोलिसांवर संशय व्यक्त करणारे. सीबीआय चौकशीची मागणी करणारे भाजपपंथी तोंडघसी पडले. सर्वांत मोठी गोची राष्ट्रीय मीडियाची झाली. रिया चक्रवर्तीला विषकन्या आहे. ड्रगची सवय लावली. ड्रग पाजून मारले. कोट्यवधी हडपले. रियाचा हँनिट्रप. याशिवाय बरंचं काही. हे आरोप खोटे ठरले. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी रियाची मुलाखत लाईव्ह दाखविली. ही दुसरी बाजू असते. एम्स अहवाल तेच सांगते. आता सीबीआय चौकशी अहवाल तेवढा उरला. गळफास कोणी लावला?
मीडिया ट्रायल फसला
मीडिया ट्रायल फसला. खोट्या तथ्यांवर ११० दिवस पोथी वाचन चालले. बिहार निवडणूक समोर ठेवून एजेंडा चालविला जातो. दरम्यान एम्सची बातमी लिक होते. सुशांत विषय हातून निसटतो. योगायोगाने हाथरस कांड हाती लागते. घसरलेली पत सावरण्यास मदत मिळते. अनेक महिला पत्रकार शेरनी बनल्या. प्रशासनावर तुटून पडल्या. हाथरस कांडाने नवा मुद्दा पुढे आला. मीडिया आणि विरोधी पक्षाने दबाव वाढविला. काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी रस्त्यांवर येतात. योगी सरकारवर काँग्रेस भारी पडते. सुशांत प्रकरण मागे पडते.
सीबीआय तपास..
बिहारचे मुख्यमंत्री नितिशकूमार यांनी निवडणुकांवर डोळा ठेऊन प्रतिष्ठेचा विषय केला. सीबीआय चौकशीची मागणी केली. भाजपच्या केंद्र सरकारने तातडीने सीबीआय चौकशीची घोषणा केली. जेडीयू व भाजपला वाटले निवडणूक सोपी झाली. सीबीआय चौकशी पथक दुसऱ्याच दिवशी मुंबईत दाखल होते. तब्बल २५ दिवस तपास चालते. हाती भोपळा लागत असल्याचे दिसू लागते. आता गळफास स्वत: सुशांतने लाऊन घेतला की कोणी फासावर लटकवले. एवढेचं तपासासाठी शिल्लक आहे.खून करून लटकवले सुध्दा नाही. बळजोरीने फासावर लटकवणे जरा कठिणच वाटते.
सीबीआयने सीसीटिव्ही कँमेरे खंगाळले. बाहेरून कोणी आंत येवू शकतो तपासले.१३ जूनच्या रात्री कोणी आलेत का ? विचारपूस केली. सर्व केल्यानंतर संशयाची सूई नातेवाईकांकडे फिरू लागली. आता धरले तर चावते. सोडले तर पळते. ही स्थिती उभी ठाकली. समोर बिहारच्या निवडणुका. सीबीआय एक पाऊल मागे हटली. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोला (एनसीबी) समोर केले. या एजेन्सीचा तपास भरकटला. एनसीबीला रिया-सुशांत आणि ड्रग असा तपास करावयाचा होता. हॉलिवूडमध्ये ड्रग पार्ट्या चालतात. हे कळण्यास सुशांतला मरावे लागले. अंमली पदार्थांना आळा घालणारी ही संस्था पार्ट्या चालत असताना झोपली होती. चिरीमिरी घेत फिरत होती. आता जुने मुर्दे उखडत बसली. कलाकारांना विचारत आहे. तुम्ही सांगा ड्रग घेतली होती. या निमित्ताने कशी आहे तपास यंत्रणा जगाला कळली. या यंत्रणेला पाचारण करण्यात आले. त्याच दिवशी चौकशीवरचा पडदा उठला होता. तरी पुन्हा तपासाचे नाटक केले गेले. हाती काहीच लागले नाही. महाराष्ट्र पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न फसला. हा बदनामीचा डाव कोणी खेळला. हे अख्या महाराष्ट्राला माहित झाला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे पहिल्या दिवसापासून राज्याचा तपास योग्य असल्याचे सांगत होते. त्यात सुप्रिम कोर्ट आडवे आले. तपास सीबीआयकडे गेला. ते बरेचं झालं. राज्याची पोलिस यंत्रणा बरोबर होती. हे देशाला कळले. सीबीआय लवकरच तोंड उघडेल. तेव्हा सारं काही स्पष्ट होईल.मात्र घसा कोरडा पडत सीबीआय चौकशीची मागणी करणारे . या निमित्ताने उघडे पडले.आता अपयशाचा झेंडा घेऊन बिहारात फिरत आहेत.
-भूपेंद्र गणवीर.
............BG...................