श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांची मागणी
राजुरा / प्रतिनिधी
अनेक वर्षापासून बामनवाडा येथे घर बांधून वास्तव्यास असलेल्या नागरिकांकडून गृह कर ग्रामपंचायतनी वसूल केले नाही यामुळे ग्रामपंचायतचा महसूल बुडत असल्याचा आरोप श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष घनशाम मेश्राम यांनी केला आहे. नवीन गृह कर आकारण्यात यावे असे अर्ज नागरिकांनी ग्रामपंचायत बामनवाडा ला दिले असताना त्यांच्या अर्जावर कुठलीही कार्यवाही न करता ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहे यावरून ग्रामपंचायतच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सुनीता नंदू गेडाम, सुनीता पोतुलवर, भविका घनशाम मेश्राम, सुष्मा अनिल जांभुळे, सुरेंद्र मारुती धोंगडे, मीना मून, सर्वेचना सुभाष आत्राम , नम्रता अंकित मालवी यांना अजूनही घर टॅक्स दिले नसल्याने यांना घर टॅक्स लागू करावा व ग्रामपंचायतचे सामान्य फंडात वाढ करावी असे निवेदन दिनांक ९/१०/२०२० ला ग्रामपंचायत बामनवाडा यांना मेश्राम यांनी दिले आहे.
बामनवाडा येथील नागरिकांना घर टॅक्स लागू व्हावा यासाठी श्रमिक एल्गार चे उपाध्यक्ष मेश्राम यांनी पुढाकार घेतला असून ग्रामपंचायत बामनवाडा यांनी घर टॅक्स लागू न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.