महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे असे म्हणणे आहे की तालुक्यातील नदी नाल्यातून जे रेतीचे अवैध उत्खनन होत आहे, त्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे, शिवाय सर्वसामान्य जनतेला घर बांधकाम करण्यासाठी चढ्या भावाने म्हणजे अव्वाच्या सव्वा भावाने रेती माफियाकडून रेती विकत घ्यावी लागत आहे, त्यामुळे महसूल प्रशासनाने रेती घाटावर आपला एक प्रतिनिधी ठेवून शासनाच्या दरात सर्वसामान्यांना रेती उपलब्ध करून द्यावी व अवैध रेती उत्खनन थांबवावे तरच खऱ्या अर्थाने रेती चोरीवर आळा बसेल, आणि म्हणूनच महसूल प्रशासनाने हा निर्णय तत्काळ घ्यावा या मागणीसाठी मनसेचे वैभव डहाणे हे वरोरा तहसील कार्यालयातील टॉवर वर चढून विरूगिरी आंदोलन करून महसूल प्रशासनाचे लक्ष वेढत आहे,
मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाणे यांची अशी मागणी आहे की रेती तस्करी थांबवून सर्वसामान्यांना रेती रास्त भावात मिळेल अशी उपाययोजना करा, तरच टॉवर वरून खाली उतरेल अन्यथा टॉवर वरून खाली उतरणार नाही, आता या संदर्भात महसूल प्रशासन काय भूमिका घेते हे येत्या काही तासात कळणार आहे.