Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर ०३, २०२०

लोकबिरादरी प्रकल्पातर्फे 'एक कुटुंब एक झाड' उपक्रम

वन्यजीव सप्ताह; वृक्षारोपन करून गांधीजींना केले अभिवादन
भामरागड  : हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पातर्फे  'एक कुटुंब एक झाड' उपक्रमाअंतर्गत   वन्यजीव सप्ताहानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून  वृक्षारोपण करण्यात आले.
सर्वप्रथम जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे व डॉ.सौ. मंदाकिनी आमटे यांच्या   हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लोकबिरादरी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, पुण्याचे मिलिंद गोडसे, सौ. शर्वरी गोडसे, लोकबिरादरी आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकबिरादरीत दरवर्षी १ ते ७ आॅक्टोबरला प्रशासनातर्फे वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येतो. सदर वन्यजीव सप्ताहानिमित्ताने व महात्मा गांधी तथा लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'एक कुटुंब एक झाड' या उपक्रमाअंतर्गत प्रकल्पाच्या परिसरात   विविध जातींच्या १०५ वृक्षांचे रोप लावण्यात आले. यामध्ये बेल, महारुख, सप्तपर्णी, निम, चारोळी, चंडी, आवळा, जारुळ, बकान, नागचाफा, रक्तचंदन, पुत्रंजिवा, सिताअशोक, अर्जुन, बेहडा, हिरडा, पापूलर, सागरगोठी, शिसम, शिशू, शेवगा, नांदरुख, हळदु, सोनचाफा, नागकेशर, बिबा, चिक्कू, मोहा, काडीर्या, कुसुम, कनकचंफा, मिनी जारुळ, पिवळा आपटा, शैहतुली, गुग्गुळ, खैर, लिची, कमरक, बोर इत्यादी जातींच्या झाडांची रोपे लावण्यात आली. प्रकल्पातील प्रत्येक कुटुंबांनी एक झाड लावले. वृक्षारोपण कार्यक्रमाला प्रकल्पातील बहुसंख्य महिला, पुरुष व लहान मुले उपस्थित होते. क्रीडाशिक्षक विवेक दुबे व त्यांच्या श्रमदान चमूनी सहकार्य केले.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.