रात्रीच्या वेळेस दवाखान्यात जाण्यास वाहन उपलब्ध नसेल तर अश्या संकटकालीन परिस्थितीत अडकलेल्या रुग्णांना दवाखान्यात पोहोचण्यास आता मोबाइल क्रमांकाचा आधार मिळाला असुन, यावर फोन केल्यास वाहनाची निःशुल्क सोय आता उपलब्ध झाली आहे.
संघर्ष चालक मालक वाहन संस्था या सामाजिक संस्थेने याबाबतीत पुढाकार घेतला असुन त्यांनी संपर्कासाठी नावे व मोबाइल क्रमांकाची यादी जाहीर केली आहे. ही सेवा निःशुल्क दिली जाणार असुन संघर्ष चालक मालक वाहन संस्था यांनी हा कर्तव्यपर उपक्रम सामाजिक जाणीव म्हणून सुरु केला आहे.
रात्रीच्या समयी अचानक तब्येत बिघडल्यास रुग्णालय गाठणे आवश्यक असते यात जर वाहन उपलब्ध नसेल तर जीवघेणा प्रसंग उद्भवु शकतो. सध्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणांवर मोठा ताण आहे, अँब्युलन्स वेळेवर उपलब्ध होईल किंवा निश्चित वेळेवर पोहचेल याची शाश्वती देऊ शकत नाही. अश्या प्रसंगी हा पर्याय उपलब्ध झाल्याने नागरीकांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.
रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत असणारी ही सेवा फक्त चंद्रपूर शहरापुरतीच मर्यादित असून सुलभतेच्या दृष्टीने शहराच्या विविध भागातील संपर्क व्यक्ती व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात सिस्टर कॉलनी करीता - नितीन कोलारकर ९८५०३१५०४०, बंगाली कॅम्प - श्रीनिवास सल्लूरी ९१५६६४४६४०, राष्ट्रवादी नगर - दिनेश पाहुने ९८३४६०५७६७, दुर्गापूर - ८६६८२९४५६६, तुकूम - राजू कावळे - ९८५०३७०२२८ देवा हेडाऊ - ९३७०२३४०२८, पंचशील चौक - रवींद्र लांडगे ९८२३४२३८२१, रामनगर - मनोज कौरासे ८८३०४०९६०९, इंदिरा नगर - मारोती कातकर ९६५७४२०४७१, पडोली - रामदास नागरकर ९८५०६८२३२१, पठाणपुरा - विनोद चांदेकर ९८९०२५३१४१, दाताळा अतुल माशीरकर ९३७०८६४०२८, घुटकाला - सोनू सालेमन ९२८४२३५१६५ , वडगाव - सूचित नांदे ९५५२२६२६१७, जटपुरा गेट - महेश हिवरकर ८६०५७४२००८, बापट नगर - विजय कुळमेथे ९६८९१६८०५४, गंजवार्ड -सुनील नंदनवार ८८८८०५७८६२ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.