Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर १४, २०२०

24 तासात 315 नवीन बाधित; तीन बाधितांचा मृत्यू

 जिल्ह्यात आतापर्यंत 9492 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3061

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12746 वर




चंद्रपूरदि. 14 ऑक्टोंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 59 स्वॅब नमुने तपासले असून त्यामधुन 315 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 12 हजार 746 वर गेली आहे. आतापर्यंत 9 हजार 492 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 61 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्येसिस्टर कॉलनी परीसरचंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू मुल येथील 82 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू रयतवारी,चंद्रपूर येथील 59  वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 16  सप्टेंबरला  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 193 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 184, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 125, पोंभूर्णा तालुक्यातील एकबल्लारपूर तालुक्यातील 5,  मुल तालुक्यातील 46, गोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 21, नागभीड तालुक्यातील 34,  वरोरा तालुक्यातील 15, भद्रावती तालुक्यातील 13, सावली तालुक्यातील 11, सिंदेवाही तालुक्यातील 27, राजुरा तालुक्यातील 10, यवतमाळ दोन तर गडचिरोली येथील तीन असे एकूण 315 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील सिविल लाइनइंदिरानगरप्रगती नगरसिस्टर कॉलनी परिसरकृष्णनगरदुर्गापुरऊर्जानगरअंचलेश्वर वॉर्डरामनगरबाबुपेठजल नगरविठ्ठल मंदिर वार्डतुकुमनगीना बागजटपुरा वार्डघुटकाळा वार्डबालाजी वार्डभिवापूर वार्डवडगावभानापेठसमाधी वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

पोंभूर्णा तालुक्यातील चिंधलधाबा परिसरातून बाधित पुढे आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्डविसापूरमानोराभागातून बाधित ठरले आहे.  मुल तालुक्यातील वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 14 ,वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 16, राजोलीमारोडा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी चौक परिसरातील बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगरटिळक नगर विद्यानगरदेलनवाडीकुर्झा वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील खडकीपंचायत समिती परिसरगिरगावकिटाली मेंढाकोजाबी मालचिखल परसोडीमेंढकीगाय डोंगरीगुजरी वार्डसुंदर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील बावणे लेआऊट परिसरचिनोरा भागातून बाधित पुढे आले आहे.

भद्रावती तालुक्यातील विश्वकर्मा नगरश्रीराम नगरगौतम नगरओंकार नगर परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील रुद्रापुरलोंढली भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरजीवनपूरवसेरानवरगावपळसगावपरिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजी वार्डसोमनाथपूर वार्डचुनाभट्टीनेहरू चौकजवाहर नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.