वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही !
देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ....
. दि. १ आॅक्टेांबर २०२०
फेसबुक लिंक https://bit.ly/3n64OUn
महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत. १९९७ च्या भुवनेश्वर येथील भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यांनतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला. अगदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीन गडकरींनी स्वतंत्र विदर्भासाठी हमी दिली होती. मार्च २०१० मध्ये सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर येथून तर देवेंद्र फडणवीसांनी शेगाव येथून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी युवा जागर यात्रा काढली होती
भाजपने तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात विदर्भ जनजागरण यात्रेचा समारोप केलाहोता. यापेक्षा विशेष बाब म्हणजे २००४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची घोषणाही केली होती, ही माहिती विदर्भ राज्य समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्याकडून मिळाली.
अमृता या नागपूरमधील डॉ.चारु रानडे आणि नेत्रतज्ञ डॉ.शरद रानडे यांच्या कन्या आहेत. देवेंद्र दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले.
खासरे वरून साभार
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛