Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

राजकिय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
राजकिय लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ऑक्टोबर ०५, २०२०

पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम  का म्हणतात?

पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम का म्हणतात?

पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम  का म्हणतात? 


.        📯 *_दि. ५ आॅक्टेांबर २०१९_* 📯

फेसबुक लिंक https://bit.ly/34nX9YX
        विधासभेच्या तोंडावर काही दिवसांत अनेक नेत्यांनी पक्षांतर केलेल्या घटना घडल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलने ही भारतीय राजकारणातील पहिली वेळ नाही. पक्षांतर केलेल्या नेत्यांना आयाराम-गयाराम असा शब्द उच्चारला जातो.

पक्ष बदलणारयाला आयाराम- गयाराम  का म्हणतात?

❗पण शब्द आला कसा ? ..
देशाच्या राजकीय जगात आराराम-गयारामची पद्धत हरियाणातून सुरू झाली. १९६७ मधील हरियाणाच्या राजकाणातील एका घटनेनंतर भारतीय राजकारणात आयाराम-गयाराम हा वाक्यप्रचार वापरण्यास सुरुवात झाला.

हरियाणातील हरनपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार गयालाल यांनी चक्क एका दिवसात ३ पक्षांत प्रवेश केला. देशाच्या राजकारणाच्या इतिहासातील हा एक विक्रमच होता. गयालाल यांचे पुत्र उदयभान होडल मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. ६७ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनाच तिकीट मिळाले.
💠९ तासांत बदलले होते ३ पक्ष
हरियाणाचे पहिले मुख्यमंत्री भगवत दयाल शर्मा यांचे सरकार पडले आणि याच काळात हसनपूरचे अपक्ष आमदार गयालाल यांनी एका दिवसांत ३ पक्ष बदलले.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,गयालाल यांनी प्रथम काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी युनायटेड फ्रंटमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा ९ तासांच्या आत ते काँग्रेसमध्ये आले. पण इतक्यावरच न थांबता पुन्हा पक्ष बदलला आणि युनायडेट फ्रंटमध्ये सहभाग झाले. तेव्हा राज्यातील नेते राव बिरेंद्र सिंह यांनी गया राम, अब आया राम असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून पक्षांतर केलेल्या नेत्यांना आयाराम-गयाराम असे संबोधले जाऊ लागले.
आयाराम-गयाराम संस्कृतीला रोखण्यासाठी अखेर १९८५ मध्ये राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा आणला. पण या कायद्यामुळे परिस्थितीत फार फरक पडला नाही. १९ डिसेंबर २००३ रोजी संसदेने ९१ वी घटनादुरुस्ती करत पक्षांतर बंदी कायदा आणखी कठोर केला.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांनी पक्षांतर करून कहरच केला आहे असे म्हणायला काहीत हरकत नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. भाजपने तर वेळोवेळी मेगाभरती केली. काहींनी तर निवडणुका जवळ आल्यानंतर पक्ष बदलला आणि तिकीट मिळाले नाही म्हणू्न पुन्हा स्वगृही देखील परतले.
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

गुरुवार, ऑक्टोबर ०१, २०२०

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न  करणार नाही !*_⚡ _*देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ....

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नाही !*_⚡ _*देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ....

 वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न  करणार नाही   !
देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ...


.        दि. १ आॅक्टेांबर २०२०

फेसबुक लिंक https://bit.ly/3n64OUn
        महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील वेगळ्या विदर्भाचे पुरस्कर्ते आहेत. १९९७ च्या भुवनेश्वर येथील भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यांनतर वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी विदर्भातील राजकीय नेत्यांनी पुढाकार घेतला. अगदी २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी नितीन गडकरींनी स्वतंत्र विदर्भासाठी हमी दिली होती. मार्च २०१० मध्ये सुधीर मुनगंटीवारांनी चंद्रपूर येथून तर देवेंद्र फडणवीसांनी शेगाव येथून वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी युवा जागर यात्रा काढली होती

वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न  करणार नाही   ! देवेंद्र फडणवीसांनी घेतली होती शपथ....


भाजपने तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात विदर्भ जनजागरण यात्रेचा समारोप केलाहोता. यापेक्षा विशेष बाब म्हणजे २००४ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी वेगळा विदर्भ झाल्याशिवाय लग्न करणार नसल्याची घोषणाही केली होती, ही माहिती विदर्भ राज्य समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांच्याकडून मिळाली.
🔹 देवेंद्र आणि अमृता फडणवीसांच्या लग्नाची कहाणी
देवेंद्र फडणवीस आणि अमृता रानडे यांची पहिली भेट देवेंद्रांचे मित्र शैलेश जोगळेकर यांच्या घरी झाली होती. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्यावेळी पहिल्या भेटीतच दोघांमध्ये तासभर गप्पा रंगल्या. त्यांनतर देवेंद्रांनी अमृताला “तू काजोल सारखी दिसतेस” असे म्हणून प्रपोज मारला होता. त्यांनतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.
अमृता या नागपूरमधील डॉ.चारु रानडे आणि नेत्रतज्ञ डॉ.शरद रानडे यांच्या कन्या आहेत. देवेंद्र दुसऱ्या वेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मार्च २००५ मध्ये दोघांचे लग्न झाले.
खासरे वरून साभार 
____________________________
🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

शुक्रवार, ऑगस्ट ०७, २०२०

३७० कलम व राजकीय चातुर्य

३७० कलम व राजकीय चातुर्य

 गुपचुप नियोजन 

🔹३७० कलम व राजकीय चातुर्य🔹



आठवतंय का?
पाच वर्षांपूर्वी पी डी पी बरोबर जम्मू आणि काश्मीरच्या सत्तेत भाजपा सामील झाली होती.
अनेक भाजपाप्रेमींना हा निर्णय मनापासून पटला नव्हता. या मुद्द्यावरून भाजपाच्या प्रवक्त्यांना सुद्धा अनेक वेळा चॅनेल वरच्या आरडाओरड्यात पडती बाजू घ्यावी लागली होती पण भाजपाची वरीष्ठ फळी अगदी शांतपणे त्यांचे काम करत होती.
चार साडेचार वर्षांनी बरोब्बर लोकसभा निवडणुकांच्या आधी पीडीपीशी अचानक काडीमोड घेण्यात आला होता. तेव्हाही अनेक जणांनी भाजपा पळपुटी असल्याचेही निष्कर्ष काढले होते. भाजपाची वरीष्ठ फळी शांतपणे काम करतच होती. काय मिळाले या चार वर्षात? अनेक " क्लासिफाईड " फाईल्सवर नुसते डोळेच नाही तर चक्क हातही घालता आला होता. कुठल्या टेबलवरून काय हालचाली होतात याची खडानखडा माहिती गोळा होत होती. सरकारी मशिनरीमधे नक्की मोल्स कोण आहेत याची यादी तयार केली जात होती. दरम्यान सैन्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत सगळे शांत होते. अनेकदा रक्त उकळेल इतकी परिस्थिती बिघडली होती. डोक्यात बर्फच भरला होता.
अस्वस्थ पाककडून आगळीक करणारी हालचाल झालीच. अगदी सडेतोड उत्तर दिल गेलं. संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी परत उभा राहिला. संपूर्ण बहुमत !!! लगेच हालचाल सुरू झाली. बॅंक ऑफ काश्मीर मधला भ्रष्टाचार उघडकीस आला. राष्ट्रपती राजवट होतीच. साडेचार वर्षातल्या सर्व गोपनीय फाईल्समधली माहिती संगतवार लावून झाली होती. एसीबीची नोटिस मेहबुबाला गेली. संपूर्ण बहुमतातल्या मोदींकडून " सबका साथ, सबका विकास " ची भूम उडवली गेली. मोदींना अक्षरश: लाखोली वाहिली गेली. अगदी कट्टर भक्तांनीही त्यांना मौलाना म्हणायलाही सुरुवात केली. काम शांतपणे सुरूच होते.
कधी नव्हे ते संसदेचे सत्र उशिरापर्यंत चालायला लागले. राष्ट्रपतींचा परदेश दौरा परवाच संपला. काल ते भारतात परत आले. काश्मीरमधे नुसता धुरळाच उडत होता. आयतेच सगळे राजकीय नेते एकाच घरात गोळा होऊन सापडले.
आज अखेरचा घाव घातला गेला. १२५ / ६१ मतांनी राज्यसभेने मान्यता देऊनही टाकली. संसदेतलं २/३ बहुमत लागेल, घटना दुरुस्ती करावी लागेल, इतकं सोप नाही, सगळीकडे आयात सुरू आहे, लवकरच कॉंग्रेस होणार भाजपाची ... अनेक तर्क, कुतर्क !!! अत्यंत धूर्तपणे हा डाव टाकला गेलाय. अमित शहा जेव्हा भर राज्यसभेत भाजपा सदस्यांना हात वर करून सांगतात की, कुठल्याही कोर्टात काही अडचण येणार नाही, तेव्हा किती अभ्यास झाला आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. आजच मतदान आणि उद्याची औपचारिकता गेल्या पाच वर्षांच्या नियोजनाची फलश्रूतीच म्हणावी लागणार आहे.
मला भाऊ तोरसेकरांचे एक वाक्य आठवते आहे, मोदीशहा जोडगोळी चोवीस तास राजकारणाचा विचार करते. परफेक्ट वर्णन आहे. त्यात दोघेही संघाचे अगदी कट्टर स्वयंसेवक. प्रचंड संयम, चिकाटी, नियोजन, प्रखरच राष्ट्रभक्ती अगदी ठासून भरलेली. त्यात गुजरातमधे दोघेही प्रचंड दुखावलेले. जंगलातलं दुखावलेल श्वापद जास्तच धोकादायक असतं असं म्हणतात. पूर्ण आदर ठेवून अस म्हणावस वाटत की कॉंग्रेसने या दोघांनाही प्रचंड दुखावून स्वत:ची कबर खणून घेतली आहे. २०१९ ची निवडणूक ही त्या कबरीतल्या कलेवरावर माती घालणे असेल तर आजचा डाव म्हणजे कबरीवरचा दगड सरकवायला सुरुवात म्हणायला लागेल. २०२४ पर्यंत बहुतेक कॉंग्रेसच आपल्या कबरीला फायनल टच देईल. आज त्यांच्या व्हिपनी राजीनामा देत इशारा दिला आहेच !!!

येणारा काळ इंटरेस्टिंग असणार आहे हे नक्की !!!
___

३७० कलम व राजकीय चातुर्य