केंद्र सरकार अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट नागपूर खनिकर्म विभाग
आमदार समीर मेघे यांच्या हस्ते उदघाटन
नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
नागपूर तालुक्यातील दवलामेटी ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या वार्ड क्रमांक तीन मधील हिलटॉप कॉलनीमध्ये भुमीगत मलवाहीनी व सेप्टीक टँकच्या बांधकामाकरीता आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान ट्रस्ट नागपूर खनिकर्म विभागातर्फे सहा कोटी रुपयाच्या विकास कामाचे भुमीपुजन आमदार समीर मेघे यांच्या हस्ते माजी सरपंच आनंदीताई कपनीचोर, माजी उपसरपंच गजानन रामेकर, भाजपा सर्कल प्रमुख प्रकाश डवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी करण्यात आले .
यावेळी माजी उपसरपंच नितीन अडसड, माजी सरपंच संजय कपनीचोर, माजी ग्रां . पं . सदस्य रमेश गोमासे ,चक्रधर सिंगाडे ,सतिश खोब्रागडे , चंद्रशेखर सिंगाडे , राजेश चांदेकर , मनिषा सिंगाडे , माधुरी सिंगाडे , कपील दरसिंगार , शरद विरखरे , वैशाली रामेकर , संगीता पोतदार , प्रभा थोरात , राजू पांडे , कृष्णराव ढोले , भगवती वर्मा, स्मिता खंडाळे, वैशाली कांबळे, विद्या सहापायले , अंजली फरकाडे, मीना रामटेके , सागर नाखले , शिवचरण शरणागत , राज शेंडे , माधुरी कोकाटे, मंगला हाते, रेणूका गुप्ता, अनीता मोरस्कर , प्रमोद कलोडे, विष्णू काकडे, आरती रामटेके, अनुसया ढोबळे, अनिता विश्वकर्मा, शोभा विश्वकर्मा, ज्ञानेश्वर सोनुले , मंदा आत्राम , इंदू सदावर्ती , चंद्रकला घागरे , जीजा घागरे, सवीता पराडकर , वैशाली काकडे प्रामुख्याने उपस्थित होते .