Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑक्टोबर २४, २०२०

कर्तव्यदक्ष प्राचार्याला बदनाम करण्याचा शिक्षकांचा डाव


 आयुध निर्माणी उच्च माध्यमिक हायस्कूल मधील प्रकार

 पालकांचा पत्रपरिषदेत  आरोप 

 शिरीष उगे(प्रतिनिधीभद्रावती) - आयुध निर्माणी उच्च माध्यमिक हायस्कूल येथील प्राचार्य मानसिक आणि शारीरिक . छळ करतात अशा आशयाची तक्रार या विद्यालयातील शिक्षकांनी पोलिसात केली. प्राचार्य हे कर्तव्यदक्ष आहे  तसेच त्यांच्या कार्यकाळात  शाळेचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे प्राचार्यांना बदनाम करण्याचा शिक्षकांचा डाव असल्याचा आरोप पालकांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.

 प्राचार्य  एन  रंगा राजू हे  सन  2017 ला या विद्यालयात रुजू झाले आपल्या शिस्तप्रिय कार्यशैलीमुळे त्यांनी मागील वर्षात शाळेची नेत्रदीपक प्रगती केली सन 2020 च्या दहावी बोर्डात  शाळेचा जिल्ह्यात पाचवा तर तालुक्यात पहिला क्रमांक आला. त्यातच प्राचार्यांनी या शाळेतील शिक्षकांच्या  खाजगी शिकवण्या बंद केल्या त्यामुळे त्यांना या माध्यमातून मिळणारा आर्थिक मोबदला बंद झाला यामुळे संतापलेल्या शिक्षकांनी प्राचार्य विरोधात मोहीम सुरू केली त्यातच एप्रिल 2019 मध्ये एका शिक्षिकेने हायस्कूलच्या काही विद्यार्थिनींना हाताशी धरून प्राचार्याच्या विरोधात पास्को सारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी अंती ही तक्रार खोटी असल्याचे निष्पनं झाले. प्राचार्य राष्ट्रीय उत्सव थोर पुरुषांच्या जयंती , पुण्यतिथी या दिवसाला कार्यक्रमाचे आयोजन करून त्या दिवसाचे व थोर पुरुषांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगतात. शाळेमध्ये स्पर्धा  परीक्षांचे  स्वतः वर्ग घेतात  सुट्टीच्या दिवशी शाळा सुटल्यानंतर काही शिक्षकांना विषयाचे अतिरिक्त वर्ग घेतात.  कोरोणाच्या काळात एन रंगा राजू  यांनी 4 ते 5  विद्यार्थ्यांचा समूह करून त्याच्या घरी जाऊन  प्रत्यक्ष शिकविण्यात देत आहे .  विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी झटत आहे .   त्यामुळे सर्व पालक  वर्ग प्राचार्यांच्या या कार्यप्रणालीवर   खुश आहेत  मात्र त्याच शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यां प्रती संवेदनशील असलेल्या प्राचार्य विरोधात जात आहे. त्यांच्या असल्या वागण्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे  तरी आयुध निर्माणी प्रशासन  आणि महाप्रबंधकानी   याकडे जातीयतेने  लक्ष देण्याची मागणी यावेळी पालकांनी केली   या संदर्भातील  निवेदन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक चंद्रपूर यांना दिले  असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी  पवन हूरकट, गणेश अय्यर, रामचंद्र पेददीवार, मनीष वाकडे, उमेश शहा, विजय गोहने , पप्पू शेख, मानसिंग जूनी, अकबर अली , महिला पालक व विदयार्थी मोठया संख्येने उपस्थीत होते .


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.