Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १२, २०२०

नागपूर येथील युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले





आंतरराज्य गुन्ह्यातील आरोपीस तात्काळ अटक करा - गृहमंत्री यांना ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांचे निवेदन



   आरोपी शहजाद रमजान वाणी, आरोपीचे वय ३० याने २४ वर्षाच्या नागपूर येथील युवतीस प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते व दिनांक:११ डिसेंबर २०१७ ते दिनांक: ३१ ऑक्टोबर २०१९ या काळात तिला ब्लँकमेलींग करत तिच्या  इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना एस.जी.एस मॉल पुणे येथे दिनांक १२ डिसेंम्बर २०१७ रोजी  घडली असून सदरील  गुन्ह्याची नोंद 'सहकारनगर,पोलीस स्टेशन, पुणे मध्ये दि ०२ जुलै २०२० रोजी गुन्हा आरोपीवर दाखल आहे. तसेच आरोपीच्या भाऊ श्री शेषबाझ वाणी व त्यांचे कुटुंबीय यांनी ही दि ०८ फेब्रुवारी २०२० रोजी युवतीस मारहाण ही केली आहे. 


          सदरील आरोपीस ९० दिवस होऊनही अद्यापही अटक झालेली नाही.महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी घटनेविषयी आवश्यक कार्यवाही करणेस संबंधित तपास अधिकारी यांना सूचना द्याव्यात तसेच आरोपीस तात्काळ अटक करावी व आरोपीला जमीन मिळणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेणेस सूचना द्यावी, या घटनेचा तपास कमीत कमी वेळेत पूर्ण करून याबाबतची चार्जशीट न्यायालयात दाखल करावी, यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री ना.अनिलजी देशमुख तसेच पोलीस महासंचालक  श्री. सुबोध जयस्वाल व पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमिताभ गुप्ता यांना पत्र देऊन गुन्ह्यातील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी  यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी ना.डाॅ.नीलम गोऱ्हे यांनी केलेली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.