मा. सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक २३ सप्टेंबर, २०२० रोजी पोलीस अधिक्षक, चंद्रपूर यांना कोविड सेंटर मध्ये भर्ती असलेल्या महिला रुग्णांकरिता सुरक्षा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन देण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढतच चालला आहे. या विषाणूमुळे बऱ्याच नागरिकांनी आपले जीव सुद्धा गमावले असून व काही या विषाणूचशी लढा देत आहे. महाराष्ट्रात अनेक हॉस्पिटल मध्ये महिला रुग्ण हि भरती आहे. व काही जिल्ह्यात त्यांच्यावर अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले आहेत. त्यामुळेच मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी महिला नगरसेविकांसोबत पोलीस अधीक्षक साहेबांना महिलांना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या सुरक्षेकरिता सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत निवेदन दिले.
या प्रसंगी महापौर म्हणाल्या कि, जे कोरोना सेंटर उभारले आहे ,त्यामध्ये महानगरपालिका सर्व आवश्यक वस्तू, सुविधा चांगल्या तऱ्हेने पुरवीत आहे. कोरोना सेंटर मध्ये भरती असलेल्या महिला रुग्णांवर कोणतेही अनुचित प्रकार घडू नये, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. या करीता त्यांना सुरक्षा प्रदान करणे अत्यंत महत्वाचे आहे. मी महिला असून शहराची प्रथम नागरिक आहे. मला याची संपूर्ण जाणीव आहे. महिलांच्या बाबतीत नेहमीच सुरक्षा मिळावी व त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी प्रयत्नशील असते. म्हणूनच कोविड सेंटर मध्ये भरती असलेल्या महिलांच्या मनात असुरक्षतेची भावना निर्माण होऊ नये यासाठी त्यांच्या सुरक्षेकरिता सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांना सुरक्षा देण्यात यावी. अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली.
या प्रसंगी मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. शीतल गुरनुले, नगरसेविका सौ. माया उईके, सौ. शीला चौव्हाण व सौ. छबूताई वैरागडे उपस्थित होते.