Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १८, २०२०

प्रहार संघटनेचा घंटानाद आंदोलन थेट ग्रामपंचायत कार्यालयावर



पाथरी - दिव्यांग बांधवांना त्यांच्या उद्धारासाठी तसेच त्याची विस्कटलेली आर्थिक घडी व समाजात वावरतांना जीवनमान उंचावे यासाठी शासनाने दिव्यांग बांधवांसाठी पंचायतराज संस्थेच्या उत्पन्नाच्या एकूण 5% राखीव निधी थेट खात्यात जमा करण्याचे 2018 चे आदेश काढत न्याय दिला असून पंचायतराज संस्थेच्या वरिष्ठ ते कनिष्ठ म्हणजेच ग्राम पातळीवरील ग्रामपंचायत कार्यालयाला सक्तीचे आदेश दिले. परंतु पाथरी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील प्रशासनाने आदेशाची पायमल्ली करत निधीचे वाटप केले नाही.
सविस्तर वृत्त असे की , संबंधित आदेशाचे सन्मान करत प्रहार संघटना पाथरी यांनी माहे जून महिन्यात दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायतीच्या एकूण उत्पन्नापैकी हक्काचे 5% राखीव निधी थेट दिव्यांगाच्या खात्यात जमा करण्याबाबत निवेदन दिले असता त्यावर कोणतेही प्रतिक्रिया न दिल्यामुळे पुन्हा प्रहार संघटनेने सप्टेंबर महिन्यात निवेदन देत 8 दिवसांच्या कालावधीत निधी जमा केली जावी असे निवेदन दिले परंतु उडवाउडवीची उत्तरे देत निधी वितरित केली नाही त्यामुळे प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा हे उद्देश गृहीत धरत ग्रामपंचायत कार्यालय पाथरीवर थेट घंटानाद आंदोलन करीत बधिर झालेल्या प्रशासनाला जागे करून पंचायत समिती येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून 15 दिवसाच्या आत दिव्यांग बांधवांची निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले असता जर निधी वितरित झाली नाही तर प्रहार संघटना आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला देण्यात आला .
आंदोलन स्थळी प्रहार सेवक प्रफुल तुम्मे, उमाजी भैसारे, कमलेश वानखेडे, मेघराज वालदे, मिथुन मेश्राम, उदय मडावी, अक्षय मडावी,आशिष नेवारे, व इतर प्रहार सेवक प्रहार संघटना पाथरी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.