नगराध्यक्ष योगिता पिपरे यांचे आवाहन
गडचिरोली, ता. २३ : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून ह्यमाझे कुटुंब- माझी जबबादारीह्ण मोहिम राज्यात राबविली जात आहे. त्या अनुषंगाने गडचिरोली शहरातही ही मोहिम राबविली जात असून या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांनी केले.
नगर परिषद गडचिरोली येथे मंगळवारी (ता. २३) माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. मडावी, प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, डॉ. गेडाम, सभापती वैष्णवी नैताम, लता लाटकर, निता उंदिरवाडे, मुख्याधिकारी संजीव ओहोळ, तालुका आरोग्य सहायक हरिदास कोटरंगे यांच्यासह सर्व नगरसेवक व कर्मचारी उपस्थित होते.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहिम शहरात १५ दिवस राबविण्यात येत आहे. यासाठी ३० पथके तयार करण्यात आले असून एका पथकात ३ व्यक्ती राहणार आहेत.
या मोहिमेंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रत्यक्ष भेट देवून प्रत्येक व्यक्तीचा थमार्मीटरने ताप मोजण्यात येणार आहे. तसेच आॅक्सीमिटरने शरीरातील आॅक्सीजनचे प्रमाण मोजण्यात येणार असून ज्यांचे आॅक्सिजनचे प्रमाण ९५ सेल्सीयसपेक्षा कमी असल्यास त्यास संदर्भ सेवा देवून कोविडची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्षा योगीता पीपरे केले आहे.