मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे जि.प.सदस्याचे साकडे
ग्रामपंचायतीला ऑक्सिजन युक्त किट व खाटा खरेदी करण्याचे आदेश द्या-जि. प.सदस्य प्रकाश खापरे
पंधरा वित्त आयोगातून नियोजन करण्याची शिफारस
खापरखेडा-बातमी
कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे देशासह राज्यात लाखो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा पन्नास हजाराच्या वर गेला आहे दररोज दीड ते दोन हजार कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्यामूळे सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालय तुडुंब भरले आहेत कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर उपचार व ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे अनेकांचा मृत्यू होत आहे त्यामूळे पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायत प्रशासनाला ऑक्सिजन युक्त किट व खाटा खरेदी करण्याचे आदेश ग्रामपंचायतीला द्या यासंदर्भातील आग्रही मागणी वलनी जि. प.सर्कलचे जि.प.सदस्य प्रकाश खापरे यांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना केली असून त्यांच्याकडे साकडे घातले आहे.
जिल्ह्यात हजारो कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे नागपूर ग्रामिण भागात कोरोना बाधित रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे जिल्हा व ग्रामिण भागात रुग्णालय आहेत मात्र खाटा उपलब्ध नाहीत एखाद वेळेस खाटा उपलब्ध असेल तर ऑक्सिजनची व्यवस्था नाही त्यामूळे मोठया प्रमाणात कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू होत आहे त्यामूळे वलनी जि. प.सर्कलचे जि. प.सदस्य प्रकाश खापरे यांनी या गंभीर प्रश्नाकडे विशेष लक्ष दिले आहे नागपूर जि. प.अंतर्गत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ऑक्सिजन युक्त किट व खाटा ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध करून द्याव्या व त्यांना खरेदी करण्यासाठी पंधरा वित्त आयोगातून परवानगी द्यावी या मागणीसाठी मुख्य कार्यपालन अधिकारी यांना जि. प.सदस्य प्रकाश खापरे यांनी नुकतेच निवेदन दिले आहे यासंदर्भात जि. प.सदस्य प्रकाश खापरे यांच्याशी संपर्क साधला असता ग्रामिण भागात सर्व सामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग आहे खाजगी रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णाला येणारा खर्च हा सर्व सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरचा आहे नागपूर जि. प.अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत तज्ञ डॉक्टरांसह प्रशिक्षित वैद्यकीय चमू कार्यरत आहेत मात्र या ठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था नाही शिवाय खाटा कमी आहेत त्यामुळे पंधरा वित्त आयोगातून ग्रामपंचायतला ऑक्सिजन युक्त किट व खाटा खरेदी करण्याची परवानगी दिल्यास काही प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळेल ऑक्सिजन अभावी मरावे लागणार नाही असे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले मात्र ऑक्सिजन नाही त्यामुळे जि.प.अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत प्रशासनाला पंधरा वित्त आयोगातून ऑक्सिजन युक्त किट व खाटा खरेदी करण्याचे आदेश दिल्यास तूर्तास कोरोना बाधित रुग्णांना दिलासा मिळेल त्यांना ऑक्सिजन अभावी मरावे लागणार नाही यासंदर्भातील निवेदनाच्या प्रतिलिपी नागपूर जि. प.अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.नागपूर व खडविकास अधिकारी पंचायत समिती सावनेर यांना देण्यात आल्या आहेत लवकरच यासंदर्भात तोडगा निघण्याची शक्यता आहे.