Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर १०, २०२०

भाजप चुकली, सेना घसरली






सुसंस्कृत भाजपला झालं तरी काय ? हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला असेल. कंगनाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. घंमड काढली. हे चांगल्या शब्दातही बोलता आलं असतं. मात्र तसं घडलं नाही. मुंबई मनपाला बाबर सेना अन् आणखी बरचं काही बरबडली. हे अयोग्य आहे . मराठी माणसाला पटणारी विधानं नाहीत. निश्चितच खटकणारी आहेत . विरोधी पक्षात असलेल्या भाजपला शिवसेनेची कशी जिरली. याची खूषी असेल. तिनं आपल्या घराला राम मंदीर म्हटलं. ते पुन्हा उभारलं जाईल असंही म्हणाली. तिचं वागण चूक की बरोबर हे जनता ठरवील. ही विधानं भाजप विरोधकांनी केलं असतं तर आतापर्यंत देशद्रोही ठरविल्या गेलं असतं. अनेकांनी पाकिस्थानात जा असं बजावलं असतं. मुंबई मनपात शिवसेनेची सत्ता आहे. त्या मनपाने कंगनाच्या बंगल्याचे अतिक्रमण पाडले. बुलडोजर चालवला. याचंही समर्थन होऊ शकत नाहीत. मुंबईत बावन्न हजारांवर अतिक्रमणं आहेत. तिथं एक अतिक्रमण असला अन् नसला का ? काही फरक पडलं नसतं. पण शिवसेना आहे. हे घडलं नसतं तर शिवसेना कसली? हे मुद्दे इंथं संपणारे नाहीत. पुढे निवडणुकीत वापरले जातील. कंगना उर्मट वागली. मुंबई आणि महाराष्ट्राला शिव्या घातल्या.अशा कार्टीच्या मागे राहणे. ही भाजपची चूक. तर सत्तेत असणाऱ्या शिवसेनेलाही सत्तेचे भान हवे. अभिव्यक्ती स्वातंत्र आहे असे समजून दुर्लक्ष करावयास हवे होते. कोणाला किती महत्व द्यावयाचे हे राजकारण समजून घेण्याची . कोणत्या स्तरावर हाताळावयाचे याचे भान ठेवण्याची गरज आहे. हे झालं राजकारणाचं ...

आता बघू मीडियाचं..

मीडियावर कंगना हिमाचलची, रिया प. बंगालची अन् भांडण महाराष्ट्रात कां ? ही पोस्ट फिरत आहे. हा प्रश्न सारखा विचारला जात आहे. हे सर्व विषय मीडियात चंगळले जात आहेत. बिहार राज्याच्या विधान सभा निवडणूक दोन महिन्यांवर आहेत. त्यामुळे सुशांत राजपूत प्रकरण तापते ठेवले जाते. हा अजेंडा ठरलेला आहे. तसे पोस्टर बिहारमध्ये झळकले. मीडियाने बाहूले बनावे. हे पटणारे नाही. मात्र टीव्ही मीडिया व्यवसायाचा भाग बनला. मालक ठरविल ते धोरण. अँकर त्याप्रमाणे वागतो. तो नोकरीला जागतो. सध्या देशाचा GDP घसरला. कोट्यवधी तरूणांच्या नोकऱ्या गेल्या. अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. मुलांना नोकऱ्या कशा मिळतील . हा प्रत्येक कुटूंबाचा जिव्हाळ्याचा प्रश्न. मध्यमवर्गियांसाठी हा काळजीचा विषय. त्यावर चर्चा नाही. लहान,मोठे व्यवसाय ठप्प आहेत. त्याची चिंता नाही. पावसाने झोडपले. त्या शेतकऱ्यांकडे बघण्यास वेळ नाही. कोरोना रूग्ण कमी होते. तेव्हा कोरोना कोरोना सुरू होता. आता ६० लाखांवर रूग्ण वाढले. तर विषयाचा प्राधान्यक्रम बदलला. मागे पडला. दिल्लीतील मरकजमध्ये तबलिगी जमात ,मौलाना साद हे विषय खूप चगळले. तब्लिगींनी कोरोना पसरविला. हे गुन्हेगार आहेत असे लोकांच्या मनात भरविले. सरकारनेही धाडी घातल्या. हजारांवर तब्लिगींना अटक केली. त्यांचे पासपोर्ट जप्त केले. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने मीडियाला आरसा दाखविला. अक्षरश: कान उपटले. सरकारवर तासेरे ओढले. सर्व तब्लिगींना मोकळे केले. पासपोर्ट परत करण्यास भाग पाडले. न्यायालयाच्या या निकालाने मीडिया रक्तबंबाळ झाला. त्यापासून बोध घ्यावयास हवा. तरी मीडिया बदलला असं वाटत नाही. सुशांत राजपूत प्रकरणात पुन्हा तसेच घडत आहे. सुशांत म्हणजे अभिताब बच्चन किंवा दिलिपकुमार नाही. तरी टीव्ही उघडली की सुशांतवर टिवटिव दिसते. एक-दोन चँनेल अपवाद आहेत. १५ कोटी रूपयांवर रियाचा डल्ला अन् बरेच काही सुरू असते. अगोदर ठरवा नेमकं काय घडलं. चार दिवस खून. चार दिवस आत्महत्या. नेमकं माहित नाही तर तसे वृत्त द्या. संभ्रम आहे. तपासानंतरच कळेल. स्वत:च निष्कर्ष काढता. दुसऱ्या दिवशी युटर्नच्या बातम्या. ह्या घटना माध्यमांची विश्वासर्हता गमावण्याची लक्षण होत. एक दिवस रिया विषकन्या,१५ करोड हडपणारी ठरते. मग समोर येते. १५ कोटी रूपयांचा व्यवहारच झाला नाही. अगोदरच बातमी देताना निर्मात्याला विचारणा केली असती. तुम्ही सुशांतला १५ कोटी दिले का ? तर १५ दिवस १५ कोटीच्या खोट्या बातम्या द्याव्या लागल्या नसत्या. शेवटी ' खोदा पहाड निकला चुहा 'असं घडलं. माध्यमांची भूमिका आरोपी पकडून देणारी हवी. संभ्रम वाढविणारी नाही. तपासाला योग्य दिशा देणारी हवी. तपासाची दिशा चुकीच्या दिशेने बदलणारी नसावी. हे भान टिव्ही माध्यमांनी ठेवले नाहीतर असेच वारंवार तोडघशी पडावे लागेल. टीआरपी घसरेल. चँनेल बघणाऱ्यांचा विश्वास उडेल. माध्यमांतील माणसं विनोदाचे विषय ठरतील. आताच लोकं नावं ठेवू लागले. अर्नब गोस्वामी सारखे उपटसूंब अगोदरच कमी नाहीत. समय ओळखा. निकालांपासून बोध घ्या. अन् मग पुढे जा .तूर्त एवढेच.


-भूपेंद्र गणवीर
...........BG...........

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.