चड्डा कंपनीचे कोळसा वाहतूक करणारे ट्रक जनतेने पुन्हा थांबविले
वाहतूक करण्यासाठी रोड नसेल तर वेकोलीने कोळसा खदान बंद करावीत... नगराध्यक्ष
शिरीष उगे (प्रतिनिधी) वरोरा
सात दिवसापूर्वी जनतेने चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीचे एकोना कडून जीएमआर व वर्धा पावर कंपनी कडे जाणारे ट्रक अडवले होते. प्रशासनाने मध्यस्थी करून सात दिवसाचा वेळ कंपनीला काढून दिला होता. या दरम्यान एकोना वेकोली किंवा कंपनी तर्फे बायपास रोडचे काम पूर्ण करायचे होते. यात रोडच्या मध्ये असलेला खड्डा व एरीकेशन चा एक पूल बनवायचा होता.मात्र गेल्या दीड वर्षापासून हे काम वेकोलिच्या उदानशीतेच्या धोरणामुळे रखडले आहे. याबाबतचा निधी सुद्धा तसाच पडून आहे. त्यामुळे वरोर्यातील जनतेला या अवैध कोळसा वाहतुकीचा त्रास सहन करावा लागत आहे.
सोमवार रात्री बारा वाजेपासून नगराध्यक्ष एहेतेशाम अली यांच्या नेतृत्वात अवैध कोळसा वाहतूक बंद करा आंदोलन सुरू केले. शिवाजी वार्डातील पूर्ण जनता नगराध्यक्ष आपला प्रश्न सोडतील अशी आशा बाळगत त्यांच्या पाठीशी होती. मात्र ही आशा जास्त वेळ पर्यंत टिकू शकली नाही. दोन तासातच नगराध्यक्ष आपल्या घरी निघून गेले.
मात्र चड्डा कंपनीचे १०० पैकी १० ट्रक शिवाजी वार्डातील माढेळी चौकात जनतेने अडवून ठेवल्याने प्रशासन व नगर प्रशासन हतबल झाले. यावेळी आंदोलकांना समजावण्यासाठी कोणतेच कारण प्रशासना जवळ नव्हते. ठाणेदार उमेश पाटील यांनी हा प्रश्न उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मांडण्याचा सल्ला देत निघून गेले.
त्यामुळे जनतेने कोणाकडे दाद मागावी असा यक्षप्रश्न जनतेपुढे उभा आहे.
चड्डा कंपनीला इतके मोठे राजाश्रय कोणाचा आहे ज्यामुळे ही वाहतूक जनतेच्या नाकावर टिच्चून करत आहे याचा प्रश्नच पडतो. या अवैध कोळसा वाहतुकीमध्ये काही बड्या राजकीय नेतृत्वाचे व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आर्थिक राजकारण सुरू असल्याची चर्चा आता होत आहे.
सोमवारची पूर्ण रात्र वार्डातील लोकांनी जागून काढली. अक्षरशः जनता माढेळी चौकामध्ये येऊन ठाण माढून बसली होती. परंतु अजूनही जनतेचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शिवाजी वार्डातील लोकांचा रोश तीव्र होत आहे. वरोरा ठाणेदार उमेश पाटील यांनी आंदोलकांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आंदोलकानी लेखी स्वरूपाचे आश्वासन प्रशासनाला मागणी केल्याने ते हतबल झाले. यानंतर आंदोलकानी चड्डा कंपनीचे ट्रक रोड मध्ये लावण्यात आल्याने माढेळीकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झाली असून सकाळ पासून शिवाजी वार्डातील लोकांनी चहा पाण्याची व्यवस्था तिथेच करून रोड च्या मध्यभागी चटई टाकून जनतेचे आंदोलन उभे केले आहे. वृत लिहे पर्यंत आंदोलक याच ठिकाणी बसून होते.