रेल्वेच्या जुन्या डब्ब्यांचे काय केले जाते?
फेसबुक लिंकhttps://bit.ly/32Yltjn
. भारतीय रेल्वे खात्याच्या गाड्यांचे डबे हे जवळपास 30 वर्षे वापरले जातात. तर काहींची दुरुस्ती करून ते जास्त काळही वापरले जातात. पण ज्या डब्यांची सर्व्हीस पूर्ण झाली असेल त्या डब्यांचे काय होते, याचा तुम्ही कधी विचार केला आहे. याबाबत कोणालाही माहिती नाही. आपण आज जाणून घेणार आहोत अशा डब्यांचे नेमके काय होते.
तसे पाहता रेल्वे या जुन्या डब्यांचा वापर अनेक कामांसाठी करत असते. पण प्रामुख्याने दोन कामांसाठी यांचा वापर करत असते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,त्या पैकी पहिले काम म्हणजे, हे डबे मॉडिफाय करून असे तयार केले जातात की ते पुन्हा प्रवासासाठी वापरता येतील आणि दुसरा वापर म्हणजे, या जुन्या डब्यांना कर्मचाऱ्यांचे घर बनवले जाते.
जे कर्मचारी आपल्या घरापासून दूर राहून काम करतात त्यांच्यासाठी या डब्यांनाच त्यांचे घर बनवले जाते. अशा घरांना कॅम्प कोचेस म्हटले जाते. कॅम्प कोचेस मध्ये राहणारे सर्व कर्मचारी रेल्वेच्या इंजिनीअरींग विभागाअंतर्गत काम करणारे असतात. अनेकदा कामाच्या निमित्ताने या लोकांना अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार या कोचेसमध्ये फ्रिज, कुलर, टिव्ही, बेड अशा सामानाची व्यवस्थाही केली जाते. रेल्वेच्या मोठ्या अधिकाऱ्यांची व्यवस्था करायची असेल तर अशा कॅम्प कोचेसमध्ये एसीही लावला जातो.