नागपूर / अरूण कराळे ( खबरबात )
नागपूर पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा बोखारा येथील शिक्षक किशोर गमे यांचा आदर्श शिक्षक म्हणून शिक्षण व अर्थ समिती सभापती सौ .भारतीताई पाटील यांच्या हस्ते मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन बोखारा जिल्हा परिषद शाळेत सत्कार करण्यात आला . यावेळी नागपूर पं . सं . सभापती रेखाताई वरठी ,खंडविकास अधिकारी श्री . किरण कोवे , गटशिक्षणाधिकारी श्री .रामराम मडावी,जि.प. सदस्य सौ .ज्योतीताई राऊत, पं .स. सदस्य सौ .अर्चनाताई काकडे , बोखाराच्या सरपंच सौ .अनिताताई पंडित, ग्रा. पं . सदस्य सौ . सुप्रियाताई आवळे , सौ .उज्वला किशोर गमे प्रामुख्यांने उपस्थित होते . श्री .किशोर गमे हे आदर्श व्यक्तीमत्व असून त्यांची संपूर्ण फाईल व इतर कार्य याबाबतची माहिती घेऊनच त्यांची निवड करण्यात आल्याचे याप्रसंगी आवर्जून सांगितले त्यांची प्रेरणा घेऊन इतर शिक्षकांनी सुद्धा कार्य करावे. आपली शाळा, गाव, केंद्र, तालुका यांचे नाव जिल्ह्यात कसे नाव लौकीक करता येईल असे उत्कृष्ट कार्य करावे असे आवाहन शिक्षण सभापती सौ .भारतीताई पाटील यांनी केले . कोरोना काळात शाळा बंद असतांनाही विद्यार्थ्यां पर्यंत अभ्यास कसा पुरवता येईल या विषयीचे प्रयत्न करावे , या सत्कारात माझी पत्नी उज्वला हिचा सिंहाचा वाटा आहे . असे मत सत्काराला उत्तर देताना किशोर गमे यांनी व्यक्त केले . प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी श्री .रामराव मडावी , संचालन शिक्षिका सौ .रंजना सोरमारे तर आभारप्रदर्शन मुख्याध्यापक श्री . तुकाराम ठोंबरे यांनी केले .
यावेळी शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष सौ .कविताताई फुलयाने , श्री . रमेश गंधारे, श्री .उमाकांत अंजनकर, श्री .गजानन राऊत, श्री .दिपक धुडस, श्री .दिगंबर जिचकार, श्री . दशरथ बांबल, श्री .जितेंद्र ठाकरे, श्री .मोहन जुमडे, श्री .प्रकाश वैरागडे, श्री .चरणदास नारनवरे, श्री .शंकर तिबोले, श्री . तुकाराम ठोंबरे, सौ .मंदा कुंडाले , सौ .दिपमाला टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.