Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर ०४, २०२०

24 तासात चार बाधितांचा मृत्यू; 279 बाधित आले पुढे

100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर
उभारण्याचे नियोजन करावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने
कोविड रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
Ø  चंद्रपुर जिल्ह्यात आतापर्यंत 1608 बाधित बरे
Ø  उपचार घेत असलेले बाधित 1799
Ø  जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या 3446


चंद्रपुरदि.4 सप्टेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लॅन्ट उभे करण्याची कारवाई तात्काळ करावी तसेच 100 खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश कोविड रुग्णालयाची पाहणी करताना  दिलेत.
कोरोना विषयक आढावा घेतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बोलताना कोरोना चाचणी करताना नागरिकांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही अशी सुविधा करावी याकडे लक्ष द्यावे असेही त्यांनी सूचना केल्यात. खाजगी डॉक्टरांच्या मदतीने कोरोना बाधितांना सेवा देण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेमार्फत द्याव्यात असे त्यांनी सुचविले. त्याचप्रमाणेरुग्णालयातील सर्व विभागानुसार नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.
रुग्णालयात लागणारे आवश्यक साहित्यऔषधे याविषयी साठा उपलब्ध असावा तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना माहिती मिळावी यासाठी मार्गदर्शन केंद्र सुरू करावे. त्याचप्रमाणेकोविडसाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी जाहिरात काढावी अशा सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला केल्यात.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोडअधिष्ठाता डॉ.एस.एन.मोरेवैद्यकीय अधीक्षक डॉ.भास्कर सोनारकरवरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा अँटीजेन चाचणीचे नोडल अधिकारी डॉ.अनंत हजारेसार्वजनिक बांधकाम विभागाचे आनंद भास्करवारराजेश चौहान उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 3446 आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 1 हजार 799 आहे. तर आतापर्यंत कोरोनातून 1 हजार 608 बाधित बरे झाल्याने सुटी मिळालेले आहे.
आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारगेल्या 24 तासांमध्ये चार बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्येरामनगर चंद्रपूर येथील 83 वर्षीय पुरूष बाधिताचा मृत्यू झाला आहे.  या बाधिताला 27 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 3 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यु हा 38 वर्षीय राजुरा चंद्रपूर येथील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 3 सप्टेंबरलाच बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता.
बाबुपेठ चंद्रपूर येथील 60 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधितेला 1 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने आज 4 सप्टेंबरला सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे.
तर,चवथा मृत्यु 80 वर्षीय चंद्रपूर शहरातील पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. 3 सप्टेंबरला बाधिताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. आज 4 सप्टेंबरला सकाळी बाधिताचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया होता. जिल्ह्यात आतापर्यंत 39 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 35तेलंगाणा एकबुलडाणा एक आणि गडचिरोली 2 बाधितांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर शहर व परिसरातील 132,  चिमूर तालुक्यातील 1जिवती तालुक्यातील 2नागभीड तालुक्यातील 2पोंभुर्णा तालुक्यातील 8बल्लारपूर तालुक्यातील 25ब्रह्मपुरी तालुक्यातील 12भद्रावती तालुक्यातील 12मूल तालुक्यातील 12राजुरा तालुक्यातील 15वरोरा तालुक्यातील 12सावली तालुक्यातील 24सिंदेवाही तालुक्यातील 4गोंडपिपरी तालुक्यातील 12, कोरपना तालुक्यातील 2 तर नागपूर जिल्ह्यातील 4 असे एकुण 279 बाधित पुढे आले आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.