खेड्या गावांमध्ये कोंबडी पालनाचा अनेक जण व्यवसाय करतात ,अनेकदा बिबट्याने शेतामधील कोंबडी- बकऱ्या फस्त केल्याचे अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, पण आज चंद्रपूर येथील जवळच असलेल्या आंभोरा गावातील शेतातील गोठयामध्ये अजगर सापाने चक्क कोंबडीच्या बेंध्यात जाऊन ३ किलोची कोंबडी व तिचे अंडी गिळून गुंडाळी मारून बसलेला होता. हि घटना आज आकाश बंडूजी थेरे यांच्या शेतातील गोठ्यामध्ये घडली.
आज सकाळी दैनंदिन कामासाठी आकाश व त्याचे बंधू अक्षय बंडू थेरे हे दोघे शेतात मध्ये गेले असता , कोंबडी पालनाचा छोटा व्यवसाय असल्याने शेतातील गोठ्यामध्ये त्यांनी कोंबडीचे पिंजरे उघडले व एक कोंबडी अंड्यावर असल्याने तिला उंचावर वेगळे बेद्यांत मध्ये ठेवलेले होते, त्यात तिचे १९ अंडे असल्याने, तिला सोडण्यासाठी गेले असता कोंबडीच्या बेद्यांमध्ये भला मोठा अजगर साप दिसल्याने आकाश थेरे हे पाहून अचंबितच झाले व त्याने लगेच ऊर्जानगर येथील हॅबिटॅट कॉन्झरव्हेशन सोसायटी चे संस्थेचे सदस्य व वन्यजीव रक्षक सुरज दहाकी यांना साप असल्याची माहिती देण्यात आली , त्यांनी लगेच चमू सोबत घटना स्थळकळे धाव घेतली , शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता चांगला नसल्याने चिखलातून पायदळ चिखल तुडवत शेतात जावे लागले, पोहोचल्यावर बघतो तर काय चक्क कोंबडीच्या बेंध्यात कोंबडी फस्त करून गुंडाळी मारून बसलेला अजगर साप आढळला, मोठ्या शिताफीने अजगर सापाला कोंबडीच्या बेंध्यातून बाहेर काढून त्याला पकडण्यात आले, मोठी कसरत करावी लागली , अजगर सापाला पकडल्यावर आकाश थेरे यांनी सुटकेच्या श्वास घेतला, अजगराची लांबी जवळपास 7 फूट इतकी होती, आकाश थेरे यांचे ३ किलो ची मद्रासी जातीची कोंबडी तिची किंमत ३००० रुपये असून व अंडयांची मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी सांगितले , ह्याची नुकसान भरपाई ची मागणी वनविभागाकळे करणार असल्याचे सांगितले.
लगेच अजगर साप पकडल्याची माहिती चंद्रपूर वनविभागाला हॅबिटॅट कॉन्झरव्हेशन सोसायटी संस्थेचे सदस्य साईनाथ चौधरी यांनी दिली, व लगेच जंगलामध्ये निसर्गमुक्त करण्यात आले, त्यासाठी अनिल पटले, अथर्व सूर्यवंशी, नीरज कन्नाके, स्नेहल साव, अमित देशमुख यांनी परिश्रम घेतले.