Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट २७, २०२०

महा मेट्रो : सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर स्टेशन दरम्यान १०.०० कि.मी. ट्रॅकचे कार्य पूर्ण



रिच – ४ व्हायाडक्टचे ८७ % कार्य पूर्ण


नागपूर २७ ऑगस्ट : महा मेट्रोच्या सिताबर्डी ते प्रजापती नगर कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून, रिच – ४ या मार्गिकेवर सुमारे १६.०० की.मी. (अप अँड डाऊन लाईन) मधिल १०.०० कि.मी. एवढ्या मेट्रो मार्गावर रूळ बसविण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. या मार्गावरील निर्माण कार्यदरम्यान लावण्यात आलेले बहुतेक भागातील प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आले असल्याने त्या भागातील बॅरिकेडस काढण्यात आले आहे.



मुख्य बाब म्हणजे या मार्गिकेवर महा मेट्रो देशातील २३१ मीटर लांबीचा ब्रिज आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आनंद टॉकीज, सिताबर्डी ते कॉटन मार्केट पर्यत निर्माण कार्य सुरु आहे. भारतीय रेल्वेच्या ट्रॅक वरून १०० मीटरचा एक स्पॅन (३ मीटरचा एक गर्डर) या रेल्वे ट्रक वरून राहणार आहे. तसेच मेट्रो या मार्गिकेच्या ८७ % व्हायाडक्टचे कार्य पूर्ण झाले आहे.



सिताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मेट्रो स्टेशन दरम्यान ८.३० किमीच्या या मार्गावर एकूण ०९ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये कॉटन मार्केट,नागपूर रेल्वे स्टेशन,दोसर वैश्य चौक,अग्रसेन चौक, चितार ओळी, टेलीफोन एव्सचेंज चौक, आंबेडकर चौक, वैष्णोदेवी चौक,प्रजापती नगर मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. नागपूरच्या पूर्व आणि पश्चिम नागपूर भागांना सेंट्रल एव्हेन्यू हा एक प्रमुख मार्ग आहे.



या मेट्रो मार्गिकेला लागून गांधीबाग, इतवारी, मस्कासाथ इत्यादी असे प्रमुख व्यापारिक क्षेत्र आहे. वाहतुकीची सुविधा या क्षेत्राकरता महत्वाची असून, मेट्रो रेल सेवेच्या माध्यमाने निश्चितच हे पूर्ण होणार आहे. नागपूरचा सेन्ट्रल एव्हेन्यू परिसर व्यावसायिक स्वरूपाचा असल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात आवागमन येथून होते.नागपूर शहराचा विस्तार होत असतांना या मार्गवरील वाहतूक देखील सातत्याने वाढली. बाजारपेठ वाहतुकीच्या गर्दीमुळे प्रकल्प राबवतांना मेट्रोने पुरेपूर काळजी घेतली. या मार्गीकेवरील प्रवासी सेवा सुरु झाल्यावर मेयो हॉस्पिटल,रेल्वे स्थानक,कॉटन मार्केट,इतवारी बाजारपेठ इत्यादी ठिकाणी जाणे सोईस्कार ठरेल.



*आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :*



पाईल्स १२८४ पैकी १२८४, पाईल कॅप २५० पैकी २५०,पियर २६७ पैकी २५३ , पियर कॅप २३१ पैकी २१६,पियर आर्म ४५ पैकी ४५, ट्रॅक आर्म ४४ पैकी ४४ ,पोर्टल ३३ पैकी ०८ , सेग्मेंट कास्टिंग २३९३ पैकी २३९३ , स्पॅन इरेव्क्शन २४९ पैकी २३०, क्रॅश बॅरियर फिव्कसिंग (pier protection) २५० पैकी २४३,मीडियन फीव्कसिंग' २४९ पैकी १११ ,असून असून मेट्रोच्या गर्डर लाँचिंगचे तसेच या मार्गावरील एनएचआयच्या डबल डेकर उड्डानपुलाचे कार्य देखील प्रगतीपथावर आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.