ज्या डोंगरकपारीत त्यांचे भविष्य गडप झाल्याचा अनुभव ते घेत होते, त्याच डोंगरकपारीत आज स्वातंत्र्याचे मंगलमय सूर निनादले. रस्ता, पाणि, आरोग्य, शिक्षण, निवारा यासारख्या सुविधा आपल्या आवाक्यातच असल्याचा नवा व आल्हाददायी अनुभव आज घोडणकप्पी वासियांनी घेतला.
या उपक्रमाला पाथ फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. दिपक चटप, स्वरप्रीती कला अकादमीचे अध्यक्ष दिलीपराव सदावर्ते यांनी भरघोस पाठबळ दिले. याशिवाय माजी आमदार अँड. वामनराव चटप साहेबांनी या कार्यक्रमात जीव ओतला. सौ. अल्काताई सदावर्ते व कु. पुजा टोंगे यांनी स्वातंत्र्यगीते गाऊन उल्हास निर्माण केला. उपेक्षित वस्तीवर नव चैतन्य निर्माण करण्याचा एक क्षण आमच्या सर्वांच्याच पर्वात जोडल्या गेले. ख-या अर्थाने अंधार चिरून काढणारा एक किरण येथे पसरविता आले, यापेक्षा मोठा आनंद तो कोणता ?
सहकार्य करणा-यांची यादी खूप मोठी आहे.