Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑगस्ट ०६, २०२०

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य




                                                                                          -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वर्क फ्रॉम होम मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहन

            मुंबईदि6सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असतांना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असतांना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली  उद्याचे जगउद्याची माध्यमेउद्याचे शिक्षण कसे असेल याची आजच जाणीव करून दिलीत्यामुळे एक पाऊल आत्मविश्वासाने पुढे टाकतांना महाराष्ट्राच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या या पिढीला पुढचे स्वप्नं काय असेल हे केवळ दाखवले नाही तर ते स्वप्न आजच प्रत्यक्षात आणलेजी स्वीट  आणि गुगल क्लासरुमच्या माध्यमातून असे पाऊल टाकणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले त्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले असून त्यांनी शिक्षणमंत्री   शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
 सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करुन देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबत गुगलने भागीदारी केली आहेया कार्यक्रमाची अधिकृत घोषणा आज ऑनलाइन कार्यक्रमाद्वारे करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.  या भागीदारीमुळे राज्यातील 2.3 कोटी विद्यार्थी आणि शिक्षक एकत्रित शिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रवेश करू शकणार आहेतजी स्वीट  फॉर एज्युकेशनगूगल क्लासरूमगूगल मीट यासारख्या विनामूल्य साधनांसह दूरस्थ शिक्षणाची सोय  यामुळे होणार आहे.
वर्क फ्रॉम होमसाठी सहकार्य करावेमुख्यमंत्री
जे शिक्षक या तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन उपक्रमात सहभागी झाले त्यांचेही मी अभिनंदन करतो असे सांगून मुख्यमंत्री श्रीठाकरे म्हणाले की गुगल मुळे हे शक्य झाले असून भावीकाळात वर्क फ्रॉम होमची संकल्पना यशस्वीपणे राबवितांना उपलब्ध तंत्रज्ञानाचा अधिकाधिक चांगला उपयोग कसा होऊ शकेल यासाठीही गुगलने सहकार्य करावेमुख्यमंत्र्यांनी गुगल क्लासरुम आणि गुगल सुट च्या माध्यमातून शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या ते म्हणाले की गुगलच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भागातील विद्यार्थ्यांची शिक्षण प्रक्रिया सुरुळित सुरु होण्यास  यामुळे मदत होईल.
गुगल आणि शालेय शिक्षण विभागाच्या प्रयत्नांचे कौतुकउपमुख्यमंत्री अजित पवार
ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसह राज्यातील इतर विद्यार्थ्यांचे शिक्षण या कठीण काळात थांबू नयेआणि प्रत्येकाला पूर्वीप्रमाणेच शिक्षण मिळवता आले पाहिजेयासाठी शालेय  शिक्षण विभाग आणि गुगल यांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक  केलेते म्हणालेविद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सुरु केलेला शिक्षणासाठी जी स्वीट आणि राज्य शाळांकरिता गुगल क्लास रुम कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.  गुगल क्लासरुम मध्ये  विद्यार्थी घरी बसून शिकू शकतातते प्रश्न विचारू शकतात आणि शंकाचे निरसन करू शकतात,
कोरोनाच्या संकट काळात शिक्षणाच्या उद्भवलेल्या समस्येला संधीत रुपांतर करुन डिजीटल क्रांतीचा योग्य वापर करुन विद्यार्थ्यांना याचा उपयोग करुन घेता येणार आहेग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनाही समान आणि  दर्जेदार शिक्षण यामुळे मिळण्याची सोय झाली आहेअसेही श्री पवार यांनी यावेळी  सांगितले.
शिक्षणातील अग्रेसर राज्य बनविणारशालेय शिक्षण मंत्री प्रावर्षा गायकवाड
 सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी आणि शिक्षणातील दरी कमी करण्यासाठी इंटरनेटच्या सामर्थ्याचा वापर करुन ,ऑनलाईन संसाधनेप्लॅटफॉर्मबँडविड्थ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन महाराष्ट्राला शिक्षणातील सर्वात प्रगतीशील राज्य बनविण्याचे आमचे लक्ष्य आहेअसे शालेय शिक्षणमंत्री प्रावर्षा गायकवाड यांनी सांगितले.
 जी स्वीट फॉर एज्युकेशन आणि गुगल क्लासरूम सारखे विनामूल्य प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल आणि या परिस्थितीशी जुळवून घेत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करत असलेल्या सर्व शिक्षकांचे प्रागायकवाड यांनी यावेळी आभार मानलेआता पर्यंत सुमारे दिड लाख शिक्षकांनी या माध्यमाचा वापर करण्यासाठी रजिस्ट्रेशन केले असल्याचेही त्या म्हणाल्यागुगल सोबत शिक्षण क्षेत्रातील नविन तंत्रज्ञानाच्या वापरासंबधी दीर्घकालीन भागीदारीची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
कोविड विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशातील सुमारे 32 कोटीहुन अधिक मुलांच्या शिक्षणात खंड पडला आहे असे सांगुन गुगल चे भारतातील विक्री प्रमुख आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता म्हणालेविद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करुन देण्यास गुगल कटीबद्ध असून राज्यासोबत सुरु झालेली ही भागीदारी भविष्यात अधिक समृद्ध होईलजी इंटरनेटद्वारे दिली जाणारी  माहितीचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावाविद्यार्थ्यांचे शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी राज्य शासन करित असलेले प्रयत्न निश्चितच प्रशंसनिय आहेत असेही ते म्हणाले.
***


ठळक बाबी
·       शिक्षणासाठी जी स्वीट: जीमेलडॉक्स आणि ड्राइव्ह तसेच क्लासरूमसह परिचित संप्रेषण आणि सहयोग साधनांचा विनामूल्य संचहे कोठेहीकेव्हाही आणि डिव्हाइसच्या श्रेणीवर शिकण्यास सक्षम करते.
·       गूगल क्लासरूमः जी स्वीट फॉर एज्युकेशन मधील एक सोपं पण शक्तिशाली साधनजे शिक्षकांना सहजपणे असाइनमेंट तयार करण्यासपुनरावलोकन करण्यास आणि आयोजित करण्यात मदत करतेतसेच वर्गात किंवा दूरस्थ शिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यास मदत करते.
·       गूगल फॉर्मः एक सोपा प्रश्न आणि प्रतिसाद साधन जे शिक्षकांना क्विझ आणि चाचण्या लवकर तयार करण्यासाठी प्रश्न भरण्यास किंवा आयात करण्यास अनुमती देते.
·       असाइनमेंट्सएक असे साधन जे शिक्षकांना लवकर  आणि सुरक्षितपणे तयार करण्यासविश्लेषण करण्यास आणि ग्रेड कोर्सवर्क करण्यास आणि विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अधिक लवचिकता प्रदान करण्यास अनुमती देते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.