Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २२, २०२०

मुक्त पत्रकार अनिल पाटील व विक्रम धनवडे यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

🔹  मुक्त पत्रकार  अनिल पाटील व विक्रम धनवडे यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर 🔹

________________________
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव 
_________________________
दि २१ अाॅगष्ट २०२० 
आपल्या ग्रूपचे अॅडमिन पेठवडगाव येथील अनिल पाटील व भादोले येथील विक्रम धनवडे यांना सरपंच सेवा संघाचा आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.या दोघासह अन्य दहाजणांचा सामावेश आहे. 
सरपंच सेवा संघातर्फे हे पुरस्कार जाहीर करणेत आले असुन कोल्हापुर जिल्हातील पत्रकार क्षेत्रात उल्लेखनिय लेखणी करणारया विविध दैनिक, इलेक्ट्रानिक मिडियाात पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना  हा पुरस्कार देऊन सन्मानित करणेत येते.यासाठी मागील पाच वर्षाची कामगिरी, त्यांची सामाजिक बांधिलकी, शासनाच्या विकासविषयक प्रसिध्दीसाठी त्यांनी केलेले काम आदी बाबी विचारात घेतल्या जातात. 
यामध्ये 
🎦 सुरेश माडकर, संपादक, दै. जनमत

🎦 अनिल पाटील, मुक्त पत्रकार पेठवडगाव.

🎦 विक्रम धनवडे, मुक्त पत्रकार, भादोले

🎦 धनाजी गुरव, बाजार भोगाव, दै. पुढारी.

🎦 दिपक मेटील, दै. लोकमत

🎦 कृष्णात जमदाडे (एस.पी.एन न्यूज)

🎦 उत्तम कागले, दै. किर्तीवंत

🎦 दिलिप जगताप, दै हिंदुसम्राट

🎦 राजु चौगले, दै. स्वातंत्र्य प्रगती

🎦 सागर धुंदरे, दै. पुण्यनगरी

🎦 अनिल पाटील चन्द्रे, इंडिया स्टिंग

🎦 शिवाजी शिंगे, मिडिया कन्ट्रोल

आदी पत्रकाराना हा पुरस्कार देणयात येऊन सत्कार करणेत येणार आहे.यासाठी सरपंच सेवा संघाचे पुणे विभाग सन्मवयक सुरेश राठोड कळवितात.
पत्रकार हा समाजाचा अारसा असतो. पत्रकारिकेतेच्या माध्यमातुन सामाजिक क्ष्त्रात कार्य करत निस्वार्थ भावनेतुन   समाजाची सेवा करत राज्यभरातील विविध भागात कायम कार्यरत असतात. ग्रामविकासात भरीव कामगिरी करणाऱ्या स्वयंसेवी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या कार्याचा आढावा घेऊन यांना प्रसिद्धी माध्यमातून योगदान देतात याबद्दल सरपंच सेवा संघ सर्वांचा आभारी आहे. सदर आपले काम प्रेरणादायी आहे अशी माहिती सरपंच सेवा संघाचे सरचिटणीस बाबासाहेब पावसे पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. 
सर्व पत्रकारांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या पूरस्काराचे वितरण आॅक्टोबर महिन्यात  "शिर्ङी " येथे होणाया एका शानदार समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. 





____

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.