Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट २१, २०२०

इथे जाणारा व्यक्ती थेट मृत्यूच्या दारात !

'इथे' जाणारा व्यक्ती थेट मृत्यूच्या दारात ! 

http://bit.ly/3y6CV2S


दि. २१  आॅगष्ट २०२०
    रोम- भूत-प्रेत हा अंधश्रद्धेचा भाग असला तरी जगामध्ये अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत जी भूत प्रेत यांनी झपाटलेली आहेत असे मानणाऱ्यांची संख्या कमी नाही. काहींचा यावर विश्वास बसेल तर काहींचा नाही. पण जगात खरंच अशी काही ठिकाणे आहेत जी भूत प्रेतने झापटलेली असे मानले जाते. इटलीमध्ये असे एक बेट आहे जेथे जाणारा व्यक्ती पुन्हा बाहेर येत नाही. होय ऐकूण तुम्हाला घाबरायला होईल पण ते खरंच...  
इटलीमधील पोवेग्लिया हे बेट मृत्यूचे बेट या नावाने देखील ओळखले जाते.या बेटासंदर्भात इटली सरकारने पर्यटकांना इशारा दिला आहे. जो कोणी या बेटावर जाईल त्याची सर्वस्वी जबाबदारी त्याची असेल. या बेटावरचे रहस्य नेमके काय आहे हे अजूनही अभ्यासकांना देखील उलघडलेले नाही. तसेच या बेटाला आइलँड ऑफ डेथ या नावाने देखील संबोधले जाते. हे बेट इटलीमधील वेनिस आणि लीडो या दोन शहरादरम्यान वेनेशियन खाडीमध्ये वसलेले आहे.
 बेटाचा इतिहास
स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, पूर्वी हे मृत्यूचे बेट त्याच्या सौंदर्याने प्रसिद्ध होते. काही वर्षापूर्वी इटलीमध्ये प्लेगची साथ पसरली होती. या आजारमुळे लाखों जणांना जीव गमवावा लागला. या आजारावर सरकारला नियंत्रण मिळवू न शकल्याने जवळपास एक लाख साठ हजारा रूग्णांना या बेटावर जिवंत जाळण्यात आले.
या रोगाच्या साथीनंतर काही दिवसानंतर काला बुखार नावाचा आजार देशभर पसरला. या आजारामध्ये अनेक लोकांचे मृत्यू झाले. त्याचे शव याच बेटावर दफन करण्यात आले. या सर्व घटनेनंतर बेटावरून विचीत्र असे आवज ऐकायला येत असत. तसेच आत्मा फिरत असल्याचे भास देखील होत असतात असा दावा काहींनी केला आहे.
नागरिकांचा हा गैरसमज दुर करण्यासाठी सरकारने बेटावर एक रुग्णालय उभारले गेले. पण येथील स्थानिक लोकांना जो अनुभव आला तोच अनुभव रूग्णालयातील डॉक्टरांना आणि काही सहकार्यांना देखील आला. तसेच तेथील रूग्णांच्या नातेवाईकांना देखील हा असा अनुभव मिळाला.
त्यामुळे हे रूग्णालय बंद करण्यात आले. १९६० मध्ये सरकारने हे बेट एका श्रीमंत व्यक्तीला विकले. पण त्या व्यक्ती आणि त्याच्या परिवारसोबत अनेक अपघात झाले. या सर्व घटनेमुळे हे बेट मृत्यूचे बेट म्हणून ओळखू लागले.
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛

'इथे' जाणारा व्यक्ती थेट मृत्यूच्या दारात !


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.