लोकप्रतिनीचे आव्हान
नागपूर / अरुण कराळे (खबरबात )
वाडी परिसरात कोरोना झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यावर आळा बसण्यासाठी स्थानीक प्रशासन नव नवीन प्रयोग करीत आहे . आरोग्य विभागांनी स्थानीक लोकप्रतिनिधीला हाताशी घेत सर्वात प्रथम लोकप्रतिनिधिची कोरोना चाचणी करुन इतर नागरीकांनी स्वतःहुन समोर येवून कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन करीत आहे . युवासेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे , राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे यांनी स्वतः सह आपल्या कुटुंबांची कोरोना चाचणी करुन घेतली आणि नागरीकांना आव्हान केले की कोरोना चाचणी आम्ही बी केले तुम्ही बी कराना .
नागपूर जिल्हा युवासेनाप्रमुख हर्षल काकडे यांनी खबरबातशी बोलतांना सांगीतले की मी स्वत: सह माझ्या कुटुंबाची आणि ड्रायव्हरच्या कुटूंबाची तपासणी केली आहे. कोरोनाला घाबरू नका कोरोनाशी लढाई करा. जर तुम्हाला कोरोना थांबवायचे असेल तर स्वत: ची तपासणी करणे आवश्यक आहे .वाडी परिसरात कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण वाढत आहे . त्याचबरोबर इतरही रोगामुळे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे . ज्या खाजगी लॅबमध्ये कोरोना तपासणीचे शुल्क जास्त प्रमाणात घेत आहे अशा खाजगी लॅबवर बंदी घाला कोरोना आज आपल्यासाठी कर्दनकाळ ठरला आहे . या स्थितीत काही लोकांनी अफवा फसरविणे फार मोठा धोका ठरु शकतो . अफवा शेवटी घातकच असतात .नागरीकांनी अफवांपासून सावध राहावे.एंटीजेन्ट टेस्ट व आर्टिफिशियल टेस्ट करण्यात येत आहे.टेस्ट करण्याकरिता नागरीकांनी सामोर येवून सहकार्य करावे. असे आवाहन केले . कोरोना बाधीत रुग्णाला गृहविलगीकरण करण्यात येते . त्यामुळे त्यांना आर्थिक करावी घराच्या बाहेर निघतांना मुखाच्छादन घालुनच निघावे . वाडी शहराची लोकसंख्या पाहता वाडीतच कोविड सेंटर उभारण्यासाठी स्थानीक प्रशासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे . असे मत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम मंडपे यांनी व्यक्त केले .