Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ३०, २०२०

नागपुर:खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा महावितरकडून सुरळीत


नागपूर/ख़बरबात:


नागपूर ग्रामीण भागात शनिवार दिनांक २९रोजी आलेल्या महापुरा नंतर खबरदारीचा उपाय म्हणून खंडित करण्यात आलेला वीज पुरवठा महावितरकडून रविवारी दिवसभरात सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या सावनेर आणि उमरेड विभागात येणाऱ्या काही गावात संध्याकाळी पुराचे पाणी ओसरले नसल्याने येथील वीज पुरवठा पूर ओसरला की सुरळीत करण्यात येईल. अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी दिली.
शनिवारी सकाळ पासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात येणाऱ्या खापरखेडा, पारशिवनी,खापा,कुही,उमरेड, मौदा,येथे पुराचे पाणी वाढू लागल्याने परिसरातील वीज पुरवठा महावितरणने टप्प्याटप्याटप्याने खबरदारीचा उपाययोजना म्हणून बंद केला.महावितरणने केलेल्या या उपाय योजनेमुळे जीवहानी झाली नाही.
आज सकाळी सावनेर विभागाचे कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे, उमरेड विभागाचे कार्यकारी अभियंता प्रफुल्ल लांडे यांनी विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सुरुवात केली. नागपूर ग्रामीण मंडळाचे अधिक्षक अभियंता नारायण आमझरे हे सतत सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी कामठी, कन्हान, मौदा परिसरात जातीने फिरत होते. माहिती घेऊन आपल्या अधिनस्थ अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत होते
महावितरण कडून सुरु असलेल्या कामाची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितीन राऊत यांना देण्यात आली. महावितरणने खबरदारीचा उपाययोजना म्हणून बंद केलेला वीज पुरवठा दुसऱ्या दिवशी तात्काळ सुरू केला. याबद्दल ऊर्जामंत्री राऊत यांनी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचारी यांचे कौतुक केले.

मौदा उपविभागात उच्चदाब वीज ग्राहकांची संख्या मोठी आहे.या वीज ग्राहकांना सध्या पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुरू करून दिला आहे. मात्र प्रत्यक्ष मंजूर जोडभारापेक्षा कमी क्षमतेने वीज वापरण्याचे आवाहन महावितणकडून या वीज ग्राहकांना करण्यात आले आहे.
खापा नगरपरिषदेच्या हद्यीतील बंद केलेले१३ रोहित्र दुपारी दोन वाजता तपासणी करुन सुरु केले. तसेच साहुली,डोरली,दहेगाव,नांदोरी,नांदपूर,गडेगाव,दुधबर्डी या गावातील वीजपुरवठा सकाळी ११वाजता सुरळीत करण्यात आला. बिना संगम येथील सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेचे दोन रोहित्र दुपारनंतर सुरू केले. वेकोलीच्या सिंगोरी येथील खाणीत पाणी असल्याने हा परिसर अजूनही अंधारात आहे.


उमरेड विभागात येणाऱ्या मोहगाव,चिचघाट,सावंगी,खरबी,हरडोली,मसळी आदी गावात गोसेखुर्द धरणातील बँक वाँटर जमा झाले होते.परिणामी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न दुपारनंतर थांबविण्यात आले.पुराचे पाणी ओसरले तर सोमवारी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल.असे महावितरणने कळवले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.