Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट २९, २०२०

भक्तानां जेल, गुन्हेगारांना बेल, उद्धव सरकार झाले फेल



देशात सर्वत्र प्रार्थनास्‍थळे सुरू असताना महाराष्‍ट्रातच बंद का:आ.सुधीर मुनगंटीवार यांचा सवाल
मदीरालये सुरू आणि प्रार्थनास्‍थळे बंद, महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार
प्रार्थनास्‍थळे उघडावी या मागणीसाठी भाजपाचे घंटानाद आंदोलन
ख़बरबात/चंद्रपुर:
कधी वेतनवाढीसाठी आंदोलने होतात, विविध मागण्‍यांसाठी आंदोलने होतात मात्र हे आंदोलन वैशिष्‍टयपूर्ण असून सर्वधर्मीयांचा सहभाग असलेले हे आंदोलन आहे. राज्‍यात दारूची दुकाने, मॉल्‍स सुरू करण्‍यात आली आहेत. त्‍याठिकाणी कोरोनाची भिती नाही. मग केवळ प्रार्थना स्‍थळांमध्‍ये कोरोनाची भिती सरकारला वाटत आहे. देशात केवळ महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद आहेत. गेली सहा महिने मुख्‍यमंत्र्यांनी जे जे आवाहन केले ते आम्‍ही नियम पाळून मान्‍य केले, त्‍यावर अमल केला. मात्र आता नियम पाळून प्रार्थनास्‍थळे उघडा अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. जहा दवा काम नहीं करती वहा दुआ काम करती है असे म्‍हणतात. अशावेळी नागरिकांना आपल्‍या श्रध्‍दास्‍थानासमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी राज्‍यातील सर्व प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.  
 
दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी भाजपातर्फे चंद्रपूर शहरात आयोजित घंटानाद आंदोलनात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. भाजपातर्फे आज मंदीर, मस्जिद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे उघडण्‍यात यावी या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्‍यात आले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, राज्‍यात दारूची दुकाने, मास विक्री, मॉल्‍स, बसेस, व्‍यापार सर्व सुरू असताना केवळ प्रार्थनास्‍थळे बंद असणे ही बाब निश्‍चीतच सर्वधर्मीय नागरिकांना न रूचणारी आहे. माहिती व जनसंपर्क विभागाला सांगून सर्व प्रार्थनास्‍थळांसमोर सावधानीचे उपाय सांगणारी नियमावली शासनाने प्रसिध्‍द करावी व सर्वधर्मीयांना त्‍यांच्‍या आराध्‍यांचे दर्शन घ्‍यायची मुभा द्यावी. देशात सर्वदूर प्रार्थनास्‍थळे उघडी असताना महाराष्‍ट्रातच प्रार्थनास्‍थळे बंद का हा प्रश्‍न अनाकलनीय आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्‍हणाले. मुस्‍लीम, ख्रिश्‍चन, शिख, बुध्‍द व हिंदू धर्माच्‍या सर्व प्रमुखांचे आंदोलनात सहभागी झाल्‍याबद्दल त्‍यांनी आभार व्‍यक्‍त केले. यावेळी दार उघड उध्‍दवा, दार उघड असे नारे देत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी घंटानाद केला. यावेळी सर्व धर्माच्‍या प्रमुखांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करत राज्‍य सरकारवर जोरदार टिका केली.
 
यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महापौर सौ. राखी कंचर्लावार, भाजपा नेते राजेंद्र गांधी, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो महानगर अध्‍यक्ष विशाल निंबाळकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य ब्रिजभूषण पाझारे, भाजपा नेते प्रकाश धारणे, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्टूवार, माजी उपमहापौर अनिल फुलझेले आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी शिख धर्माचे चरणजीतसिंग वाधवा, चमकोरसिंग बसरा, बलबीरसिंग गुरम, रविंद्रसिंग भाटीया, हिंदू धर्माचे मनिष महाराज, विजय चिताडे, ख्रिश्‍चन धर्माचे फादर सुनिल कुमार, फादर घाटे, फादर अमीन कलवल, पास्‍टर प्रकाश भगत, पास्‍टर सुमेन जेनेकर, विजय नळे, मुस्‍लीम धर्माचे मुश्‍ताक खान, बौध्‍द धर्माचे भंते कृपाशंकर महाथेरो, करूणा बोधी, धम्‍मप्रकाश, जैन धर्माचे महेंद्र मंडलेचा, अमर गांधी, प्रकाश गोठी, गायत्री परिवाराचे डॉ. शैलेंद्र शुक्‍ला, अरविंद तिवारी, मनोज मालवी, श्री. वडपल्‍लीवार, दिपक चोप्रा आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती. यावेळी सर्व धर्मीय प्रमुखांनी आपआपल्‍या धर्मांची प्रार्थना सुध्‍दा केली.
कार्यक्रमाचे संचालन नगरसेविका सविता कांबळे यांनी केले. आभार डॉ. मंगेश गुलवाडे यांनी व्‍यक्‍त केले. यावेळी सोशल डिस्‍टन्‍सींग पाळत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर देवराव भोंगळे, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्‍या नेतृत्‍वात एका शिष्‍टमंडळाने मागणीचे निवेदन जिल्‍हाधिकारी यांना सादर केले.  

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.