युवासेनेचे पोलिस निरीक्षक व मुख्याधिकारी यांना निवेदन
नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
संचारबंदीत जवळपास सर्वच व्यावसायीकांना व्यवसाय करण्याची संधी दिली आहे .हॉटेल ही सुरू असुन पार्सल ची परवानगी दिली आहे त्याच प्रकारे हातगाडीवरील ख़ाद्य पदार्थ विकण्यासाठी परवानगी दया . राज्य शासनाने दुकाने रात्री ७ वाजता पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार वाडी नगरपरिषद अंतर्गत असणाऱ्या सर्व दुकानदारांना रात्री ७ वाजता पर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश दयावे अशा आशयाचे निवेदन वाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक व मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांना युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे यांच्या नेतृत्वात युवासेना संघटक प्रमुख विजय मिश्रा, तालुका प्रमुख अखिल पोहनकर,शहर प्रमुख सचिन बोंबले,संघटक प्रमुख क्रांती सिंग ,मोहीत कोठे यांच्या उपस्थितीत देण्यात आले .
फुटपाथवरील हातगाडी वर व्यवसाय करणारे गरीब मजुर असून चार महीने झाले त्यांच्या हाताला काम नाही . त्यामुळे ते हलाकीचे जीवन जगत आहे . त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निकाली काढावा असेही निवेदनातुन स्पष्ट केले आहे .
या दोन्ही प्रश्नावर मुख्याधिकारी व वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली . दोन्हीही प्रश्न ताबडतोब सोडविणार असून याबाबतचे पत्रक काढणार असल्याचे हर्षल काकडे यांनी तभाशी बोलतांना सांगीतले .