नागपूर/ प्रतिनिधी
राज्यसभेत खासदार म्हणून खासदार उदयनराजे भोसले महाराज शपथ घेत असताना त्यांनी "जय भवानी" "जय शिवाजी" अशी घोषणा केली त्यावर उपराष्ट्रपती व राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी त्याचा विरोध केला, उपराष्ट्रपती यांचा या कार्यपद्धतीचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश व नागपूर शहर , राष्ट्रवादी पदवीधर संघ नागपूर जिल्हा च्या वतीने निषेध नोंदविण्यात आला व त्यांना "जय भवानी" "जय शिवाजी" या जयघोषाचे पत्र लिहून पाठवण्यात आले.
याप्रसंगी प्रामुख्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *जगदीश पंचबुधे,* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस *राहुल कामळे, नागेश देढमुठे,* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर अध्यक्ष *रवि पराते,* राष्ट्रवादी पदवीधर संघ नागपूर जिल्हाध्यक्ष *गौतम वैद्य,* राष्ट्रवादी युवक काँग्रेस नागपूर शहर उपाध्यक्ष *कुणाल लारोकर,* राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नागपूर शहर उपाध्यक्ष *राहुल वाघमारे, रजत अतकरे,* रा.यु.काँ शहर महासचिव *चेतन खिंची,* रा.वि.काँ दक्षिण नागपूर अध्यक्ष *हिमांशू पंचबुधे,* *साहिल राऊत, जय आतुलकर, प्रज्वल नानोटकर, रवि कडबे, विजय गावनडे, शहानवाज खान, शाहरुख खान, प्रणय शहारे, पंकज वाघमारे, नीरज पाटील, निशांत घोडे, जय पटेल, विकास नंदनवार, साहिल शहरे* इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते