किशोर खेवले/ गङचिरोली
मंगळवारपासून नक्षलवाद्यांचा सप्ताह सुरू होत आहे. त्यामुळे पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र केले आहे.
28 जुलै ते 3 ऑगस्ट या कालावधीत नक्षल सप्ताह होत असून, या पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांनी पेरलेला दहा किलोचा भूसुरुंग पोलिसांनी ध्वस्त केला.
याकाळात नक्षलवाद्यांकडून हिंसक कारवाया, जाळपोळ, नुकसानीच्या घटना घङतात.
त्यामुळे जिल्हा पोलिस दल सतर्क झाले असून जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. चामोर्शी तालुक्यातील टेगडी येथील पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील टेगडी ते कोटमी जंगल परिसरात स्थानिक पोलिस जवान अभियान राबवित होते. त्यावेळी रस्त्यावर घातपात घडविण्यासाठी नक्षलवाद्यांनी तब्बल दहा किलो वजनाचा भूसुरुंग पेठन ठेवला होता. अभियान राबविताना हा भूमुळंग पोलिसांच्या निदर्शनास आला . याबाबतची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना देण्यात आली . त्यानंतर गडचिटोली येथून बाँबशोधक व नाशक पथक घटनास्थळी पाठविण्यात आले . या पथकाने अत्यंत खबरदाटी घेत भूसुरुंग निकामी केला . त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि नक्षलवाद्यांचा कट उधळला गेला.