संजीव बडोले- प्रतिनिधी/नवेगावबांध
नवेगावबांध दि.2 जुलै:-गोंदिया जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढतच आहे.आज 2 जुलै रोजी सडक अर्जुनी तालुक्यातील खोडशिवनी येथील कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाने मृत्यूचा आकडा आता 2 वर पोचला आहे.
पहिल्या रुग्णाचा मृत्यू हा नागपूरात झाला. तर दुसऱ्या रुग्णाचा मृत्यू गोंदियात कोरोनावरील उपचार सुरु असताना झालेला आहे.खोडशिवनीतील रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्या गावात कडक बंदोबस्त करण्यात आले असून, अर्जूनिमोर च्या उपविभागीय अधिकारी व इन्सिडंट कमांडर शिल्पा सोनाले यांनी त्या गावच्या पुर्ण सीमा सिल करण्याचे आदेश दिले आहे.मृत रुग्णावर गोंदियातच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी गावकर्यांशी केलेल्या चर्चेनंतर घेतल्याची माहिती आहे.