जनतेच्या हितासाठी चंद्रपूर शहर (जिल्हा)
काँग्रेस कमिटी तर्फे रस्त्यावर येऊन आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर(खबरबात) :
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठा बंद होत्या. त्याच प्रमाणे चंद्रपूर येथील मालमत्ता धारक मध्यम वर्गीय आहेत. तीन महिने बाजारपेठ बंद असून आता आर्थिक मंदीचे सावट आहे. त्यामुळे गाळेधारकांचे चार महिन्यांचे भाडे रद्द करा तसेच मालमत्ता करात ५० टक्के सूट घ्या नाहीतर जनतेच्या हितासाठी चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी तर्फे रस्त्यावर येऊन आंदोलनाचा इशारा करू असा जनहितार्थ इशारा शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन महापौर राखी कंचर्लावार, मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना दिले. यावेळी महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार, गोपाल अमृतकर, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक दुर्गेश कोडाम, माजी नगरसेवक एकता गुरले, एन. एस. यू.आ य. प्रदेश महासचिव कुणाल
चहारे उपस्थित होते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे शासनाने लाॅकडाउन जाहीर केला. मार्च, एप्रिल, मे असे सलग तीन महीने व्यवसाय 100 टक्के बंद होते. व आता जुलै मध्ये सकाळी 10 ते 5 या वेळेत सुरू असल्याने मंदीचे सावट आहे. व्यवसाय ठप्प असल्याने गाळेधारकांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच दुकानाचे भाडे द्यायचे कसे असा प्रश्न या व्यवसायिकांवर पडला आहे. शहरातील मनपा अंतर्गत येणारे गोल बाजार, टिळक मैदान, आझाद बगीचा नेहरू मार्केट, संजय गांधी मार्केट, जटपूरा कांजी, नेताजी नगर भवन, सुपर मार्केट भिवापूर, महाकाली मंदीर मार्केट, इंदीरा नगर मार्केट, गंज वार्ड, रामाळा तलाव, राजकुल मार्केट, व्यापार संकुल, सराई मार्केट इ. गाळे महानगरपालीके अंतर्गत येतात. यांचेे मागील 4 महिन्याचे मनपाचे गाळे भाडे माफ करण्यात यावे.
तसेच शहरातील मालमत्ता धारकांना ही कोरोना काळात कोणताच व्यवसाय करणे शक्य झाले नाही. शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग वास्तव्यास आहे. तुटपुंजा पैशात कुटूंब चालवित असतो. सद्या सर्वत्र मंदीचे सावट असून आर्थिक दृष्ट्या त्यांचे या काळात नुकसान झाले आहे. तरीही सन 20-21 या काळातील मालमत्ता करात 50 टक्के सुट देण्यात यावी. अशी जनतेच्या हिताची मागणी चंद्रपूर शहर काॅगे्रस कमिटी तर्फे करण्यात आली आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करू असा इशारा शहर (जिल्हा) काँग्रेस अध्यक्ष रामू तिवारी यांनी दिला आहे.