एकाच घरातील १० कोरोना पॉजिटीव्ह
नागपूर / अरूण कराळे(खबरबात):
वाडीतील कोरोना पॉझिटिव्हची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सोमवारी दोन मित्राचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता . त्यापैकी एका मित्राच्या घरातील नऊ सदस्य व एका मित्राची बहीण कोरोना पॉजिटीव्ह आल्यामुळे तीन महीन्यापासून सुरक्षित असलेली वाडी असुरक्षित झाली आहे .
धम्मकिर्ती नगर मधील ३१ वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आला होता. तर लाव्हयातील महादेवनगर मधील एसआरपी पोलीस कर्मचारी कोरोना पॉजिटिव्ह होता . क्वारंटाईन केलेल्यापैकी शनिवार ११ जुलै रोजी धम्मकिर्तीनगर मधील कुटुंबातील ९ सदस्य कोरोना पॉजिटीव्ह आल्यामुळे वाडीत कोरोना रुग्ण १४ झाले आहे . तर महादेवनगरमधील पोलीसाची ३० वर्षीय बहीणही पॉझिटिव्ह आली त्यामुळे लाव्हयातील कोरोना पॉझिटिव्हची संख्या दोन झाली .
प्राप्त माहितीनुसार धम्मकिर्तीनगरमधील कुटूंब सदस्यापैकी वाडी नगर परिषदच्या अग्निशमन दलामध्ये काम करणारा ३२ वर्षीय तरुण कोरोना पॉजिटीव्ह आल्यामुळे नगरपरिषद कार्यालयात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अग्नीशमन कर्मचारी २७ जुन पासून रात्रपाळीत काम करीत होता त्याच्यासोबत सहा कर्मचारी काम करीत होते .
या सहा कर्मचाऱ्यासोबत इतर नऊ लोकांना नागपूरला क्वारंटाईन करण्यासाठी नेले आहे . धम्मकिर्तीनगरमधील कुटूंबातील एक महीला सदस्य अग्रवाल गॅस एजन्सी मध्ये काम करते , एक महीला धुणी भांडीचे काम करते तर एक महीला खाजगी कंपनीत काम करते त्यामुळे या महीला अनेक नागरीकांच्या संपर्कात आल्यामुळे वाडीत कोरोना ब्लॉस्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे .घटना स्थळावर मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले , नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले,तालुका अधिकारी डॉ. सचिन हेमके,वरीष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र पाठक,वैद्यकीय अधिकारी डॉ. सुषमा धुर्वे,माजी नगरसेवक नरेंद्र मेंढे ,आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे ,सरपंच ज्योत्सना नितनवरे, उपसरपंच महेश चोखांद्रे,पं. स. चे माजी उपसभापती सुजित नितनवरे,सचिव विकास लाडे ,ग्रा. पं. सदस्य पुरुषोत्तम गोरे ,पांडुरंग बोरकर उपस्थित होते .
वाडीत जनता कर्फ्यू लावा ,साखळी खंडीत करा
नगरपरिषद वाडी अंतर्गत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे . वाडी व वाडीलगत गावात आजपर्यंत कोरोना पॉजिटीव्हचे ३५ च्या वर रुग्ण गेले आहे .त्यामुळे वाडी शहरातील प्रत्येक रहीवाशाची कोरोना टेस्ट व्हायलाच पाहीजे .असे आवाहन महाराष्ट्र शिववाहतुक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश अग्रवाल यांनी केले आहे.
कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी जनता कर्फ्यू लावणे हाच एक पर्याय आहे .शेजार धर्म पाळून शेजारी जर कोणी बाहेरून आले असेल त्याची माहीती नगरपरिषदचे आरोग्य निरीक्षक धनंजय गोतमारे यांच्याकडे मोबाईलद्वारे दयावे .असे आवाहन वाडी ब्राम्हण सेनेचे अध्यक्ष राजू मिश्रा यांनी केले आहे .कठोर पाऊल उचलावे लागणार
प्रतिक्रिया
वाडी परिसरात कोरोना प्रसार व रुग्ण वाढ ही चिंतेची बाब आहे नगरपरिषद ,तहसील प्रशासन ,तहसील आरोग्य विभाग व व्याहाड आरोग्य केंद्र फैलाव रोखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्नशिल आहे मात्र नागरीकांचे सहकार्य आवश्यक आहे .दिलेले नियम व सुचना गंभीरतेने पालन करणे गरजेचे आहे . स्थिती नियत्रंण बाहेर गेल्यास जनता कफर्यु सारखा कठोर नियम भाग पडेल
मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले
नगर परिषद ,वाडी