गर्दी जमू न देण्याचे ग्रामपंचायतीला दिले निर्देश
चंद्रपूर (खबरबात):
चंद्रपूर जिल्ह्यात सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून काल पर्यंत ३२४ पुढे आले.दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत असून सुद्धा चंद्रपूरकरांनी मात्र याचा धसका अजूनही घेतला असल्याचे गुरुवारी समोर आले.
चंद्रपूर शहरालगत असलेल्या जुनोना गावातील तलावात चंद्रपूर व आसपासच्या परिसरातील मूल-मुली येथील मिनी वॉटरफॉल बघण्याकरिता व त्याचा आनंद लुटण्याकरिता मोठी गर्दी करू लागले.सध्या कोरोनामुळे लॉकडाउन आहे. अशातच कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून मास्क व सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्यास प्रशासन सांगत आहे. मात्र आपल्याच धुंदीत असणारा हा तरुण वर्ग मज्जा मारत फिरू लागला आहे.
कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीला देखील हे विसरणं मुक्त संचार करू लागले आहे. जुनोना परिसर हे पर्यटन स्थळ असून पावसाळ्याच्या दिवसात येथे तरुणाईची चांगलीच गर्दी असते मात्र यंदा कोरोनाने हि गर्दी काहीश्या प्रमाणात दडली आहे. मात्र तरूणीच्या या अलगर्जीपणामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तसेच मास्क नसल्याने चिंता अधिकच वाढू शकते. त्यामुळे आज जुनोना तलाव येथे बल्लारपूर पोलीस दाखल झाले व सर्वांना घरी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या तर काहींना समज देऊन सोडण्यात आले. मात्र या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून स्थानिक ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.