चंद्रपूर(खबरबात):
शिक्षक हे भविष्य बनवीत असतात. शिक्षक हे गुरु असून त्यांना आदराचे स्थान आहे.मी देखील शिक्षकाचा मुलगा आहे. परंतु खुद्द शिक्षण विभाग शिक्षकांना हीन वागणूक देत असून ते मी कदापि हे खपवून घेणार नाही. तसेच शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या संपत्ती देखील चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना केली. यावेळी भद्रावती नगर परिषदचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी कार्यालयातील विविध समस्यांवर व कोरोना संकटामध्ये शाळा सुरु करण्याच्या निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या सोबत चर्चा केली.
यावेळी शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनेक प्रकरणे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्या जातात, माध्यमिक शाळांचा खाते व मंडळ मान्यता विहित करण्याचे प्रस्ताव धूळखात पडलेले असतात, संबंधित विस्तार अधिकारी मुख्याध्यापकांना अपमानास्पद वागणूक देतात, कुठलीच माहिती देत नाही, मुख्याधिकाऱ्यांना आल्या पावली परत जावे लागते, यावर शिक्षणाधिकारी डोळेझाक करतात, कार्यालयाचे अधीक्षक संबंधित कर्मचारी भेटल्याशिवाय कुठलीच फाईल काढत नाही, अनेक शिक्षकांचे मेडिकल बिल यासह अन्य प्रस्ताव धुळखात आहे. असे अन्य विषय शिक्षकांचे होते. ते खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना सांगितले.
त्याचप्रमाणे भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी जसे स्पष्ट आदेश काढले आहे. अशाच प्रकारचे स्पष्ट आदेश चंद्रपूर येथे देखील काढावे, त्याच प्रमाणे शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात शिक्षकांसोबत गैरवर्तन व अपमानास्पद वागणूक दिल्यास अशा अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही. खासदार बाळू धानोरकर यांनी जिल्ह्यातील शाळा सुरु करण्याबाबतच्या संभ्रम दूर करणारा आदेश तात्काळ काडून संभ्रम दूर करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिल्या.