नवेगावबांध पोलीस ठाणे व स्वयंसेवी संस्थाचा स्तुत्य उपक्रम
संजीव बडोले
प्रतिनिधी, नवेगावबांध.
नवेगावबांध दि. 27जुलै:-पोलीस ठाणे नवेगावबांध येथे सृष्टी संस्था येरंडी, गडचिरोली -भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ गोंदिया, पर्यावरण मित्र चंद्रपूर, स्वीस ऍड पुणे यांच्यावतीने covid-19 मुळे उद्भवलेल्या आपत्काळात सहाय्यता करण्याकरता, गावस्तरावरील सहायता समितीने शिफारस केलेल्या रामपुरी व जांभळी या गावातील 77 गरजू लाभार्थ्यांना दोन महिन्याचे राशन व स्वच्छता राखणे विषयीची सामुग्री चे 26 जुलै रोजी रविवार ला वाटप करण्यात आले.
यावेळी भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ गोंदियाचे प्रकल्प संचालक मनीष राजनकर, दीलीप पंधरे, घनश्याम कुंभरे पोलीस पाटील जांभळी, नंदलाल मेश्राम, नवेगावबांधचे पोलीस ठाण्याचे ठाणेदार पोलीस निरीक्षक दिनकर ठोसरे ,धाबेपवनी एओपी चे पोलीस निरीक्षक भुरले, वागज उपस्थितीत होते. नक्सल, दुर्गम ,आदिवासी क्षेत्रातील जांभळी येथील 43 व रामपूर येथील 34 गरजू लोकांना दोन महिन्याचे राशन व स्वच्छते विषयक वस्तूंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सामाजिक अंतर व स्वच्छता तसेच एसओपी चे तंतोतंत पालन करण्यात आले.
अन्नधान्य वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलिस स्टेशन नवेगावबांध, एओपी धाबेपवनी येथील अधिकारी ,कर्मचारी यांनी सहकार्य केले.