Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २८, २०२०

🔹संजीवनी शोधण्याचे प्रयत्न होणार 🔹

⭕संजिवनी वनस्पती शोधण्याचे प्रयत्न होणार⭕*
________________________
माहिती सेवा गृप पेठवड़गाव
_______________________
डेहराडून : वृत्तसंस्था🌿
रामायणात लक्ष्मणाला वाचवण्यासाठी हनुमानने हिमलयातून ‘संजिवनी’ आणली होती🌿.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=208498319548099&id=100011637976439संजीवनी शोध
नेमकी संजिवनी वनस्पती कोणती हे ओळखता न आल्याने पूर्ण द्रोणगिरी पर्वतच हनुमानाने उचलून लंकेला नेला होता. या संजिवनी वनस्पतीची भूरळ संशोधकांना आणि ऋषीमुनींना प्राचिन काळापासूनच आहे. ही संजिवनी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न आता सरकार करणार आहे.♍🌿
आयुष मंत्रालयाने यासाठी समिती स्थापन केली असून उत्तराखंड सरकारने यासाठी निधी दिला आहे.🌿
मंत्री सुरेंद्रसिंग नेगी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘जागतिक पातळीवर औषधी वनस्पतींची मागणी प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे जीव वाचवण्याची क्षमता असलेली ही वनस्पती आम्ही शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.’
आयुर्वेदामधील तज्ज्ञांची समिती स्थापण्यात आली असून ही समिती ऑगस्ट महिन्यात काम सुरू करणार आहे.
रामायणात द्रोणगिरी पर्वताचा दाखला आहे. उत्तराखंडमध्ये आजही द्रोणगिरी नावाने पर्वत आहे. डेहराडूनपासनू ४०० किलोमीटर अंतरावर चामोलीमध्ये हा पर्वत आहे. या पर्वतावर संजिवनी शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
यापूर्वी २००८ मध्ये बाबा रामदेव यांचे शिष्य आचार्य बालकृष्ण यांनी संजिवनी वनस्पती शोधण्यात आल्याचा दावा केला होता.
उत्तराखंड ही औषधी वनस्पतींची खाण असून औषधी गुणधर्म असलेल्या अनेक वनस्पती येथे सापडतात.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.