Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २७, २०२०

28 ते 30 जुलै पर्यंत गडचांदूर येथे कडक लॉकडाऊन


नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे आवाहन
गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक
चंद्रपूरदि.26 जुलै: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता गडचांदूर येथे दिनांक 28 जुलै ते 30 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. 30 जुलै नंतर काही दिवस लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात येईल. त्यानंतर आणखी 3 दिवस लॉकडाऊन करण्यात येणार आहे. अशी माहिती उपविभागीय अधिकारी श्री.लोंढे यांनी दिली आहे. याविषयीचा आदेश काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. गडचांदूर नगर परिषद येथे कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी श्री.लोंढे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड यांनी प्रशासनातील गडचांदूर येथील अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी यांचा कोरोना संदर्भात आढावा घेण्यात आला.
दरम्यान,सर्व स्थानिक आयएमए डॉक्टरांची बैठक ठेवावी. सर्व आयएलआय रुग्णांवर देखरेख ठेवून त्यांची चाचणी करून घ्यावी. प्रशासन आणि आयएमआय यांच्यात समन्वयाची यंत्रणा स्थापित करण्याची सूचना यावेळी डॉ.निवृत्ती राठोड यांनी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिल्यात.
गडचांदूर मध्ये जास्त प्रमाणात औद्योगिक क्षेत्र असल्याने बहुतांशी कारखान्यांच्या विशेषत: सीमेंट कारखान्यांच्या ट्रकचालकांची अधिकाधिक चाचणी या लॉकडाऊनच्या काळामध्ये करण्यात येणार आहे. तसेच या दरम्यान आयएलआय रुग्णांवर देखरेख व चाचणी करण्यात येईल.
अलगीकरणाची सुविधा वाढविण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी आरोग्य विभागाला कळविणे व तपासणी करून संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक आहे. नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावाबाहेर पडताना मास्क वापरावा, असे आवाहन नगराध्यक्षा सविताताई टेकाम यांनी केले.
यावेळी नगर परिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगीतहसिलदार महेंद्र वाकलेकरमुख्याधिकारी विशाखा शेळकीसहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गेडाम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नळे व इतर वैद्यकीय अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.