नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
शिवसैनीकांसाठी १९ जुन हे आनंदाची पर्वणीच असते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोना प्रादुर्भाव काळात रक्तदानासाठी केलेल्या आव्हाहनाला पक्षाच्या ५४ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन वाडी शहर शिवसेनेने रक्तदान करुन उत्तम प्रतीसाद दिला .
स्थानीक गुरुदत्त सभागृहामध्ये वाडी शहरप्रमुख प्रा. मधु माणके पाटील यांनी आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन खासदार कृपाल तुमाने यांचे हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले. जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे , उपजिल्हाप्रमुख दिलीप माथनकर व विधानसभा सहसंपर्क प्रमुख दिवाकर पाटणे यांनी छत्रपती शिवराय , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेचे पुजन करुन हारार्पण केले. यावेळी वाडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक , शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रक्तपेढी प्रमुख डॉ..धर्माळे , विधानसभा संघटक संतोष केचे , युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल काकडे ,शिवसेना नागपूर तालुका प्रमुख संजय अनासाने, उपतालुका प्रमुख रुपेश झाडे, तुषार डेरकर विनोद सातींगे , अमोल कुरडकर, संतोष केशरवानी , विजय मिश्रा , आखील पोहनकर ,रामसिंग , अभय वर्मा अखिलेश सिंग,विलास भोंगळे, दिनेश तिवारी , किशोर ढगे,राम सिंग , सुनिल मंगलानी ,शिवम राजे , सुभाष माने विनय वडे , आदित्य हेंबाडे ,सौरभ घडीनकर , गुलशन शेंडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांच्या मार्गदर्शनात शहरप्रमुख मधु माणके पाटिल यांच्या नेतृत्वात अनेक तरुण व महीला भगीनींनी भगवा हाती घेवुन शिवसेनेत प्रवेश केला.पक्षाच्या वर्धापनदिनी रक्तदान करुनच भगवा हाती घेतलेल्या सर्व तरुण व महीला भगींनींचे कौतुक करुन शिवसेनेसाठी सुखदायक क्षण असल्याचे प्रतिपादन खासदार कृपाल तुमाने यांनी केले .
राजेंद्र हरणे , दिलीप माथनकर यांनी रक्तदान करुन सेनेत प्रवेश घेतलेल्या सर्व तरुणांचे अभिनंदन करीत पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव काळात डॉक्टर,परीचारीका ,औषध विक्रेते, पोलीस कर्मचारी , सफाई कर्मचारी व प्रशासनाचे माणसे हे जीव मुठीत घेवुन कोरोना विरोधात लढत असतांना शिवसैनीक रक्ताची कमतरता भासु देणार नाही असे जिल्हाप्रमुख राजेंद्र हरणे यांनी स्पष्ट केले.