वाडी ,लाव्हा येथील नागरीकांचे विद्युत
विभागाच्या अभियंताला निवेदन
नागपूर / अरूण कराळे (खबरबात ):
कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या काळात सर्व लोकांचे कामधंदे बंद होते आर्थिक उत्तपन्नाचा स्रोत बंद असल्याकारणाने विद्युत विभागाद्वारे सुद्धा विद्युत ग्राहकांना या काळात सरासरी बिल देण्यात आले व बिल भरण्यापासून काही प्रमाणात सूट देण्यात आली.
परंतु या चालू जून महिन्यात मागील तिन्ही महिन्याचे एकत्रित बिल देण्यात आले असून ही बिल रक्कम जास्त होत असल्याने हे बिल भरायचे कसे ही चिंता वाडी नगर परिषद क्षेत्रातील विद्युत ग्राहकांना पडली आहे नागरीक विद्युत विभागावर चिडून आहेत अश्यावेळी वाडी शहर भाजपा अध्यक्ष केशव बांदरे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ विद्युत विभाग कार्यालयात पोहचले व सहाय्यक अभियंता रुपेश मेश्राम यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली की,
वीज बिल किस्त मध्ये भरण्याची मुभा मिळावी, ज्यांचे बिल वास्तविक मीटर रीडिंग पेक्षा जास्त आहे अश्यांचे तत्काळ वास्तविक मिटर रीडिंग नुसार बिल आकारणी करावी, अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांच्या वीज बिलात 50%सूट देण्यात यावे
निवेदन देतेवेळी भाजपा वाडी मंडळ उपाध्यक्ष कमल कनोजे ,चंद्रशेखर देशभ्रतार, बापू लिमकर, सुरेश विलोणकर, समीर मसने देवराव खाटीक, सतीश नांदनकर, गजेंद्र देवघरे ,अनिल घागरे ,बंटी मेहरकुरे आदी उपस्थित होते.
लाव्हा येथे आक्रोश
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तीन महीने संचारबंदी होती . महावितरण कंपनीने तीन महीन्यापर्यंत वीज बिल पाठविले नव्हते . आज अचानक लाव्हा गावात तीन महीन्याचे वीज बील आल्यामुळे कामगार मजुर वर्गानी धास्तीच घेतली . तीन महीन्यापासून हाताला काम नसल्यामुळे पोट कसे भरावे ही चिंता असतांना अव्वाच्या सव्वा वीज बील पाठवून धक्काच दिला आहे. तीन महिन्यांपासून कामाच्या अभावामुळे लोक आधीच अस्वस्थ झाले आहेत. त्वरित वीज बील आल्यामुळे ग्राहक अडचणीत आले आहे.
तीन महिन्यांचे बिल माफ करा, अन्यथा तीन हप्त्यांची किस्त तयार करा ,गरीब मजुर वर्गाचा विचार करुन वीजबिलात सवलत दया अशा आशयाचे निवेदन वाडी महावितरणचे उपअभियंता रूपेश मेश्राम यांना देण्यात आले. यावेळी माजी पं. स. सभापती सुजीत नितनवरे,दवलामेटी सर्कल प्रमुख प्रकाश डवरे,मधुकर बर्वे,बबन पिचकाटे, विजय बर्वे,राजेन्द्र धारगावे ,सुरेश देशमुख ,अरूण बोरडकर ,दामोदर ढाेणे ,हिसनलाल सेन भिमराव पटले प्रामुख्याने उपस्थित होते.
उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती.१०० युनिट पर्यंत वीज बिल भरायचे नाही असे सांगितले होते.परंतु संपूर्ण घोषणा फसवी असल्याचा आरोप माजी पं. स. उपसभापती सुजित नितनवरे यांनी केला.