Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जून १९, २०२०

वाडीतील दुचाकी चोर आरोपीची मध्यप्रदेशात हत्या Madhya Pradesh murder accused of stealing two-wheeler from Wadi





वाडी पोलिस सहा महिन्यापासूनआरोपीच्या शोधात

दहा दुचाकी वाहन वाडी पोलिसांनी केले जप्त 


 नागपूर / अरूण कराळे (खबरबात)
पोलिस स्टेशन वाडी अंतर्गत येणाऱ्या विविध क्षेत्रात मागील अनेक महिन्यापासून दुचाकी चोरीच्या घटना सातत्याने वाढत होत्या त्यासंदर्भात तक्रारी मिळताच वाडी पोलिस आपले तपास चक्र फिरवत असताना यातील मुख्य आरोपी याचा मध्यप्रदेशात खून झाला असून चोरीच्या दुचाकी विकत घेणाऱ्या आरोपीस दुचाकी वाहनासह वाडी पोलिसांनी अटक केली आहे.



प्राप्त माहितीनुसार वाडी परिसरातील दुचाकी चोरटा कुख्यात आरोपी मृतक हार्तिक उर्फ छोटू कटरे राहणार  महादेव नगर , लाव्हा ,वाडी येथील निवासी असून वाडी परिसरातील विविध भागातून दुचाकी वाहन चोरून मध्यप्रदेशात विक्री करायचा याची खबर वाडी पोलिसांना लागताच मागील सहा महिन्यापासून पोलीस दुचाकी वाहन चोरट्याच्या  शोधात होते.सतत वाढत्या चोरीच्या घटना तपास गांभीर्याने घेत असून शनिवार १३  जून रोजी सहायक पोलीस निरीक्षक अविनाश जायभाये,एनपीसी महेंद्र सडमाके,जितेंद्र दुबे यांनी मध्यप्रदेशातील सौसर येथून आरोपी एक जितु उर्फ जितेंद्र शंकर चाके वय ३२  रा .सौन्सर याचे कडून आठ  वाहने तर आरोपी दोन पुनीत अशोक बोडखे वय ३०  रा. सौन्सर याच्याकडून दोन वाहने जप्त करून अटक केली असता यात एक बुलेट,सहा अँक्टीव्हा,दोन  पल्सर,एक यामाहा अशा अंदाजे सहा लाख रुपये  मालाचा समावेश आहे.तसेच या सर्व चोरीच्या दुचाकी वाडी येथील छोटू कटरे यांच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले.मुख्य आरोपी छोटू कटरे याचा मध्यप्रदेशात खून झाल्याची तक्रार लोधिखेडा  पोलीस स्टेशनला दाखल असून खुनाचा तपास मध्यप्रदेश पोलीस करीत आहे.
आरोपींवर  ३७९ ,४११ अन्वये गुन्हा दाखल डीसीपी विवेक मासाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक, दुययम पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस  निरीक्षक  अविनाश जायभाये  करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.